अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती निवडणूक 2023 चा निकाल जाहीर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


       सासवड (झेंडेवाडी)  : दि. २९, सासवड येथील झेंडेवाडीत सदस्य गणेश जाधव यांच्या फार्म हाऊसवर  अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ संलग्न जनलोक वार्ता समिती महाराष्ट्र प्रदेश व पश्चिम महाराष्ट्र निवडणूक 2023 चा निकाल अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक राजूसाहेब शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महिला अध्यक्षा व निवडणूक अधिकारी सोनाली जगताप व अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे  खेड तालुकाप्रमुख व निवडणूक अधिकारी लतीफ शेख यांनी जाहीर केला. जनलोक वार्ता समिती ची दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीचे पदाधिकारी यांची निवडणूक रविवार दिनांक २९ रोजी झाली व त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. 

या निवडणुकीत विजयी पदाधिकारी उत्तम खेसे, राजगुरूनगर. ( महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ), संतोष गाडेकर राजगुरुनगर. ( महाराष्ट्र प्रदेश सचिव ), चंद्रकांत सलवदे, पुणे. ( महाराष्ट्र प्रदेश खजिनदार ), अमोल जाधव,  इस्लामपूर. ( महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ), विशाल खुर्द, शिराळा. ( महाराष्ट्र प्रदेश उपकार्याध्यक्ष ),  रणजित चव्हाण, शिराळा. ( पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ), मुस्तफा चाबरू, पुणे. ( पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ), गोरख गाडे, पुणे. ( महाराष्ट्र प्रदेश संघटक ) मुन्ना शेख, ( महाराष्ट्र प्रदेश उपसंपर्कप्रमुख ), अनिल मुद्गुंडे, पुणे. ( पश्चिम महाराष्ट्र उपसंपर्कप्रमुख ), संदीप जगताप पुणे. ( महाराष्ट्र प्रदेश उपखजिनदार ), व राजू चव्हाण, देहूरोड, पुणे. पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख या पदावर निवड झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व निसर्गाच्या सानिध्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या निवडणुकीची सर्व व्यवस्था राजूसाहेब शिंगाडे, इस्माईल तांबोळी, मुस्तफा चाबरू व गणेश जाधव यांनी केली होती. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जनलोक वार्ता समितीचे सदस्य तुकाराम शेळके, धर्मपाल कांबळे, दत्ता भगत, सलीम तांबोळी, राहुल चौधरी, नवीन अदीवाल व सर्व उमेदवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकार संघाचे संतोष शिंदे, दयानंद गौडगाव, गौरव जगताप, वजीर पठाण इ. उपस्थित होते.

 दुपारी सर्व सदस्य यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रफिक शेख यांनी शाकाहारी व मांसाहारी उत्तम भोजन बनवल्याबद्दल त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी राजेसाहेब शिंगाडे यांनी संपादक व पत्रकार संरक्षण कृती समिती च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रणजित चव्हाण यांची नियुक्ती केली. ही संरक्षण कृती समिती अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाच्या महाराष्ट्रातील सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आली असून संपादक, पत्रकार यांच्यावर होणाऱ्या हल्ल्या बाबत ही संरक्षण कृती समिती तातडीने त्यांना मदत करण्यासाठी पोहोचणार व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कार्यवाही करणार  असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी दिली. व महाराष्ट्रातील सर्व सदस्यांना या संपादक व पत्रकार संरक्षण कृती समितीत समाविष्ट व्हायचे असेल तर रणजित चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक +919858540909 असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात