पोस्ट्स

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई ,  दि. 10 : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल ,  अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.             यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.             सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा  उल्लेख  वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल ,  असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते सिमेंटचे करणार- मंत्री गिरीश महाजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. 10 : राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत येणारे रस्ते सिमेंटचे करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.             विधानसभा सदस्य सुनील राणे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत केलेल्या कामांचे कंत्राटदारांकडून वस्तू व सेवाकराची रक्कम कपात न केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.             मंत्री श्री.महाजन म्हणाले की ,  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाबाबत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम देयक अदा करताना नियमानुसार वस्तू व सेवाकराची कपात करून कंत्राटदाराला देयके अदा केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर त्यांची बीड कॅपॅसिटी किती आहे हे तपासली जाते.             यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार ,  सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात ,  बाळासाहेब पाटील ,  हरिभाऊ बागडे ,  नारायण कुचे ,  प्रशांत बंब ,  आशिष जयस्वाल यांनी सहभाग घेतल

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.९: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या 'केएस' या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३०  दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी  १० मार्च २०२३ रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) १० मार्च २०२३ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० व

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ९  : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. महानगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, ग्राहक संघटना सदस्य, शाळा/महाविद्यालयातील सदस्य, वैद्यकीय व्यवसायिक, व्यापार व उद्योग क्षेत्र, पेट्रोल व गॅस विक्रेते, शेतकरी यामधून सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.  विहित नमुन्यातील अर्ज तसेच अटी, शर्ती व निकषांच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या कारवाईत ६१९ आस्थापनांकडून ३२ लाख रुपये दंडवसुली

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ९:  अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून २०२२-२३ या वर्षामध्ये फेब्रुवारी २०२३ अखेर वैध मापन शास्त्र नियमांचा भंग केल्याबद्दल जिल्ह्यातील विविध ६१९ आस्थापनांवर दंडात्मक कारवाईद्वारे ३२ लाख ६० हजार ७०० रूपये इतके प्रशमन शुल्क शासनास जमा करण्यात आले आहे.  नुकतीच वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून चिकन, मटन विक्रेते आस्थापनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. यामध्ये १०० आस्थापनांची तपासणी करुन दोषी आढळलेल्या ६० आस्थापनांवर खटले दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली आहे.   आवेष्टित वस्तुंवर नियमानुसार घोषवाक्ये नसणे, मूळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या डिलीव्हरी बॉयकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. ग्राहकांना विविध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करताना नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यांनी नियंत्रक कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ व  व्हॉट्सॲप क्रमांक ९८६९६९१६६६ किंवा ई-मेल आयडी d

आठवे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान ; महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना पुरस्कार

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली, दि. 8 मार्च : उत्कृष्ट छायाचित्रणासाठी  महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, परिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळया श्रेणीतील उत्कृष्ट छायाचित्रणांसाठी 13 छायाचित्रकांराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते  छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील ‘विशेष उल्लेख’ हा पुरस्कार पुण्यातील दिपज्योती बनिक आणि उमेश निकम यांना प्र

महिला दिनानिमित्त बचत गट सदस्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 8:- भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह येथे नागरी सहकारी बँका,पतसंस्थेच्या महिला संचालिका, सभासद व स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलाकरीता एक दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाला माजी महापौर कमल व्यवहारे, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मानद सचिव विद्या पाटील, शिक्षण-प्रशिक्षण मुख्याधिकारी एम.डी. भोईर, सहकारी संस्था सहनिबंधक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकुर, सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा देवून श्रीमती व्यवहारे म्हणाला, सहकार क्षेत्रात महिलांना स्थान देण्यात आल्यामुळे त्यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. सहकार क्षेत्रात महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था म्हणून कार्य कर

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीत महिलांचा सन्मान ; महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम - कृषि आयुक्त सुनील चव्हाण

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व  महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी / कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाला मुख्य अभियंता, अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे,  कृषिविस्तार  प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषि संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते. कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी प्रारंभी महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी -कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्

अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश ; पगारवाढीसह पेन्शनचा ही लाभ मिळणार ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि.२८,  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान आज सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. तर अंगणवाडी सेविकांनाही दिलासा देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी अनेकवेळा अंगणवाडी सेविकांनी आंदोलनही केले. तर मागील तीन दिवसांपासून राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. या पार्श्वभूमीवरच सरकारने अंगणवाडी सेविकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अजूनही त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन देखील सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच मानधन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणीही अंगणवाडी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.             याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 300 कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी 4 हजार 700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

वाल्हेकरवाडीत शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्साहात

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव   निगडी दि.१९ , अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती वाल्हेकरवाडीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शिवभक्त प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते हे सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील (कन्नड भाषिक) आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या थाटात शिवजयंती साजरा करुन साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे.               या शिवजयंतीला राजकीय, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चिंचवडे ,  आदेश नवले, ज्ञानेश्वर वाल्हेकर आदी उपस्थित होते.                या शिवजयंती उत्सवा दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठान चे संस्थापक- नागेश सुतार, अध्यक्ष- मल्लीनाथ सुतार, उपाध्यक्ष -मल्लिनाथ कोरे , सचिव- बाशाभाई मुल्ला, शिवा फुलारी, गोपी अर्जून, गंगाधर गुरव, धनराज पुजारी आदिंनी परिश्रम घेतले. 

आदर्श शिक्षक शांताराम बाबुराव खेसे यांचे दुःखद निधन ; रयत शिक्षण संस्थेत शोककळा

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी  / उत्तम खेसे   राजगुरूनगर दि.२६,  शांताराम खेसे हे रयत शिक्षण संस्था या मोठया संस्थेत वाघेळे ता . शिरूर या संस्थेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत होते . स्वतः बीएस्सी बी पी एड् असून क्रिडा , गणित , विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत होते . त्यांच्या मार्ग दर्शनातून अनेक विद्यार्थी खेळात जिल्हा , राज्य पातळीपर्यत घडले . अवघड गणित, विज्ञान विषयाचा दरवर्षी १०० % निकाल एस.एस. सी . बोर्ड  या वर्गाचा लावत असे . त्यांना जिल्हाआदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान झाला होता . २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी राजगुरूनगर पॅथॅलॉजी लॅब मध्ये शुगर, युरीन टेस्ट करण्यासाठी गेले असता , युरीन घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेले तेथेच त्यांना भोवळ येऊन खाली कोसळले . त्यानंतर हॉस्पिटल मध्ये नेले चेंकिग केले असता त्यांची प्राणज्योत मालविली होती . एक नावाप्रमाणे शांत, संयमी , हुशार शिक्षक हरपला . शैक्षणिक क्षेत्रातील चौकोनी चिरा, आदर्श नेतृत्व, कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेल त्यामुळे राजगुरूनगर शहरात दावडी गावात हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली , एक भाऊ , द

कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वितरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२५:  कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते आणि उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. कसबा पेठ विधानसभा मतदार संघात रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार असून २७० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.  साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन करण्यात आले. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी २७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून यंत्रणा सज्ज झाली आहे. ६०० पोलीस कर्मचारी व ८३ अधिकारी यांची निय

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे दि. २५: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनि

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ ; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 24 : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.              औरंगाबाद" या शहराचे नाव बदलून ते "छत्रपती संभाजीनगर" असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, " औरंगाबाद ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.             उस्मानाबाद" या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव" असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या  महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद", तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते " धाराशिव ” तालुका व जिल्ह

आढले खुर्द येथे कविवर्य विठ्ठल दळवी यांच्या कार्याचा गौरव

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील आढले येथे कोथुर्णे गावचे सुपुत्र विठ्ठल दळवी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत गौरविण्यात आला.  त्यांनी अभंग व पोवाडे च्या रुपात महाराष्ट्राची परंपरा व अस्मिता  जपत संत विचारांतून समाजाला एक वेगळी दिशा देणारे पुरोगामी विचारांचा वसा व वारसा जपणारे संत विचारांशिवाय समाजाला पर्याय नाही यासाठी पुन्हा संत व शिव विचारांची समाजाला गरज आहे,  जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येईल तेव्हा तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा आधार घ्यावा लागेल. तेव्हाच मानव पृथ्वीवर सुखाने जगेल व जो ग्रंथांचा अभ्यास करेल  तोच पृथ्वीवर तरेल व संतांचा महिमा किती महान आहे याची प्रचिती आणून दिली.  यावेळी ऋषिकेश येवले किसन जगदाळे समीर राक्षे व  समस्त ग्रामस्थांच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

चिंचवड मतदारसंघात सुमारे चौदा लाखाची रोकड घेतली ताब्यात

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर  संनियंत्रण पथकाने (स्टॅटिक सर्व्हेलंस टीम) आज दुपारी दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली  एसएसटी  पथकाने ही कामगिरी केली आहे. या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तात्काळ याबाबत आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर  विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन  आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करुन आयकर  विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. एसएसटी पथकाद्वारे  चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून २४ तास हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याद

कसबा पेठ मतदारसंघात आतापर्यंत २८ लाख रुपये भरारी पथकाकडून ताब्यात ; कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तात वाढ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२४: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली असून नाके तपासणी व भरारी पथकांच्या तपासणीत एकूण पाच घटनांमध्ये २८ लाख १८ हजार ५०० इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार सायंकाळी ६ वाजेपासून प्रतिबंध आहेत.  पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे.

पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी ; औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.२४: २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामध्ये काम करणारे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क् बजावता यावा यासाठी रविवार  २६ फेब्रुवारी २०२३ रोजी भरपगारी सुट्टी अथवा २ तासाची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने जारी केले आहे.  लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले असून अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे परिपत्रक जारी केले आहे. *कामानिमित्त मत

संत गाडगेबाबा जयंती निमित्त ग्रामीण भागात स्वच्छतेसंबंधीत कामांचा शुभारंभ

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 24: संत गाडगेबाबा जयंती निमित्त काल गुरुवारी  जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच शुभारंभ गावस्तरावर करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 ची गतीने अंमलबजावणी सुरु असून या अंतर्गत गावस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी राबवून गावात शाश्वत स्वच्छता ठेऊन गावे ‘हागणदारीमुक्त अधिक’ (ओडीएफ+) घोषित करण्यात येत आहे.  2022- 23 मध्ये जिल्ह्यातील गावांत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ‘ओडीएफ+’ घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 2022-23 मध्ये जिल्ह्यात 1 हजार 125 वैयक्तिक शौचालय बांधकाम करून ते वापरात आणण्यात आलेले आहेत. तसेच 65 वैयक्तिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या 253 सार्वजनिक शौचालय युनिट पैकी बांध

निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २४: कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात  आले. मतदारसंघातील विविध भागात भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.    यावेळी निवडणूक निरीक्षक निरज सेमवाल,  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी  उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक मतदानावर भर दिला आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतदारांनी मतदानाचा अमूल्य हक्क अवश्य बजवावा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले. *लोकशाहीच्या उत्सवात तरुणाईचा सहभाग* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने आणि स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृ

मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षणाचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.24: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मावळ आणि मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र असे एकूण 87 तरुण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.  बारा दिवसाच्या या प्रशिक्षणात आपत्ती व आपत्ती चे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भूकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास, आग व आगीचे प्रकार, व्हर्टीकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२३:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी  २६ फेब्रुवारी  रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी  २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना  तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी कळविले आहे.    मतदान बंद होण्याच्या ४८ तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची य

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -२०२२ करिता प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    पुणे, दि. २३: उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२२ करीता  १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात.  उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

कसबा पेठ मतदारसंघात मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि.२२: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रप्रमुखांमार्फत मतदार मार्गदर्शिका आणि मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करून मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदारसंघातील २७० मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले आहे. मतदारांना मार्गदर्शिकेच्या माध्यमातून मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांना मतदार यादीतील नाव, क्रमांक आणि मतदान केंद्र याविषयीदेखील माहिती देण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देत असून नागरिकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत ६९ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले असून एकूण अडीच लाखाहून अधिक मतदारांपर्यंत निवडणूक कर्मचारी पोहोचणार आहेत. नागरिकांचा  मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्याचा हा निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. याला जनजागृती उपक्रमांचीही जोड देण्यात आली असून मतदारसंघातील विविध भागात उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.  मतदारांना माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शिका तयार केली आहे. यात मतदार यादीतील नाव शोध

निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे प्रशिक्षण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे,दि..२३:-चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान कामकाजासाठी  मतदान केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण निवडणुक विभागामार्फत  निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय थेरगाव येथे देण्यात येत आहे.   मतदान प्रक्रीयेवेळी मशीन सीलबंद करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणदेखील या ठिकाणी दिले जात आहे. मतदारांनादेखील ईव्हीएम यंत्रावर मताधिकार बजावण्यासाठी माहितीपर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ वाजेपर्यंत  प्रशिक्षण सुरु राहणार आहे. या उपक्रमाची पाहणी निवडणूक निरिक्षक एस. सत्यनारायण यांनी केली. या उपक्रमाला  नागरिकांचा  चांगला  प्रतिसाद मिळाला.  अशिक्षित, वयोवृद्ध, नवोदित मतदारांना ईव्हीएम यंत्राद्वारे मताधिकार बजावताना  कोणत्याही अडचणी येऊ नये, यादृष्टीने त्यांना माहिती दिली जात आहे.  नागरिकांनी सकाळी  ११ ते सायंकाळी  ५ या वेळेत या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. *निवडण

गोल्डन कार्ड काढणे शिबीरास लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी/ विशाल खुर्द        शिराळा दि.२३,    शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून निवड झाली असून गोल्डन कार्ड धारकांना दरवर्षी पाच लाखापर्यतचा आरोग्य विषयक उपचार मोफत मिळणार असल्याने शिराळा नगरपंचायत मार्फत आज दिनांक 23/01/2023 व दिनांक 24/01/2023 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यापैकी दिनांक 23/01/2023  रोजी शिराळा शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर शिराळा , लक्ष्मी मंदिर, कदमवाडी रोड नवजीवन वसाहत शिराळा , इंदिरा गणेश मंडळ शिराळा , यादव हॉस्पिटल जवळ कॉलेज रोड, शिराळा , मारुती मंदिर होळीचे टेक शिराळा या 5 ठिकाणी आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून  एकूण 350 गोल्डन कार्ड काढण्यात आले आहेत. तरी उद्या दिनांक 24/01/2023 रोजीही सदरचे शिबिर

इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / लतिफ शेख   खेड : इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष छगनजी राठोड अशोक तोडमल ,उद्योजक व प्रेरणादायी वक्ता ,मनोज कुमार ढगे , कृषी अधिकारी वैभव चव्हाण ,सर्जेराव पिंगळे , सतीश नाईकरे ,राष्ट्रपती पदक विजेते विठ्ठल भोर ,केशव बनकर , चेतन पोखरकर , साहेबराव सातकर , पत्रकार दत्ता भगत , रामदास रेटवडे, व आसपास गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते . या मॉलमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट , हेल्थकेअर , सौंदर्य प्रसाधने ,आर्युवेदिक उत्पादने व 100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट राजूनगरमधील लोंकाना  प्राप्त होणार आहे . या कार्यक्रमाची दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रेरणादायी वक्ते अशोक तोडणकर यांनी आपले विचार व्यक्त केले . व कंपनीचे अध्यक्ष छगन जी राठोड यांनी कंपनीचे तीन उद्दिष्टे सांगितली ती म्हणजे जमिनीला काळ्या आईला वाचवणे ,राष्ट्रप्रेम , व समाज जागृती , व महिला सबलीकरण , हे कंपनीचे उद्दिष्ट असून प्रामुख्याने रासायनिक खत वापरल्यामुळे अनेक आजारांचे मूळ आहे , सेंद्रिय खताचे

ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी -विजय धादवड आळंदी देवाची : मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी देवाची मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी राजमाता जिजाउंच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली..याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, , मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतुजा भारंबे व अक्षरा आघाव यांनी केले.

शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विकास पॅनेलने उडविला परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / बाळासाहेब मुळे खेड/ चाकण : शिवछत्रपती खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण या पतसंस्थेची निवडणूक पार पडली यामध्ये दोन पॅनल अनुक्रमे विकास पॅनल,  परिवर्तन पॅनल व अपक्ष या मध्ये मतदान झाले.      मतदान प्रक्रिया पार पडली असता विकास पॅनलने १२/० अशी बाजी मारली .इतर मागास प्रवर्गामधुन मधुकर नाईक ,सर्वसाधारण प्रवर्गामधुन  अविनाश कड ,विजय पवार ,राजेंद्र चौधरी ,बाळासाहेब  मुळे आदलिंगे विलास, काळे संतोष, घेनंद पांडुरंग ,घोरपडे सरिता  ,टोपे एकनाथ  ,शेलार नंदकुमार , अनुसूचित प्रवर्गामधुन आव्हाड प्रशांत हे बारा उमेदवार बहुमताने विजयी झाले. एकुण १५ सभासद असुन तीन बिनविरोध निवड झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे भटक्या जाती प्रवर्गातुन देवकाते हरीदास, महिला वर्गातून खराबी प्रिती, शेरकर अंजली यांची निवड झाली.      महत्वाचे म्हणजे विरोधी पॅनलने निवडणूक प्रचारा दरम्यान अपप्रचार करुन सुध्दा सुजान मतदारांनी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडूण दिले.       विकास पॅनला भरघोस मतदान करुन सर्व शिक्षक सेवकांचे आभार व्यक्त करताना विकास पॅनलचे प्रमुख मधुकर ना

जि.प.प्राथमिक शाळा -ठाकरवाडी वेताळे शाळेस एनप्रो इंडस्ट्रीज लि.पुणे व रोटरी क्लब ऑफ निगडी ,कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांचे कडून साहित्य वाटप

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर      राजगुरुनगर  दि.१२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी वेताळे या शाळेस  एनप्रो इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे, रोटरी क्लब ऑफ निगडी - पुणे, कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांच्या वतीने अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.  यामध्ये, १. ई-लर्निंग व सोलर संच २. पिण्याच्या पाण्याची १५०० लिटर पाण्याची साठवणूक क्षमतेची टाकी , लोखंडी स्टँड व संपूर्ण प्लंबिंग ३. कृतियुक्त शैक्षणिक साधने ४. शालेय परसबाग ५. वृक्षारोपण ६. २ के.व्ही. क्षमतेचे सौरउर्जा  संच युनिट  ७. सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.         कडूस, दोंदे , वेताळे, सायगाव या ग्रामपंचायत क्षेत्रातील १४ ठाकर वस्त्यांमध्ये ग्राम समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी क्षेत्रातील ठाकर वस्त्यांसाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत शाळेस या सुविधा उपलब्ध करत देण्यात आल्या. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. समाजातील लोकांनी विकासात्मक कामामध्ये स्वतःहून पुढे येऊन आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्या साठी योगदान देणे ग

ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करण्याचे आवाहन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११: जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.  निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब  २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्

कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री; कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’ वर- कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११: मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. गुप्ता यावेळी म्हणाले. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी उपस्थित होते. कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, असे सांगून श्री. गुप्ता म्हणाले, बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना पुरवणे आवश्यक असलेल्या स

अवैध मद्य विक्री व अवैध मद्य सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ११ : महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे ६८ व ८४ कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात ७ ते ९ जानेवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून एकूण २९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर २५ आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण ३७ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.  यापूर्वी सप्टेंबर २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये अशा प्रकारचे एकूण ३५ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यामधील एकूण ७१ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून १ लाख २७ हजार ८०० रुपये  इतका दंड करण्यात आला आहे.  याशिवाय अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीचे समुळ उच्चाटण करण्यासोबतच गुन्हेगारांना वचक बसविण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने चालू वर्षामध्ये ३८२ सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केलेले आहे. तसेच एमपीडीए अंतर्ग

पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्धघाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि.११: राज्याचे पोलीस महासंचालक  रजनिश सेठ यांच्या हस्ते ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिह, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद, होमगार्डचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार,पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.  पुण्याच्या सांस्कृतिक आणि क्रीडा नगरीत  पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ चे आयोजन होत असल्याचबाबत आनंद व्यक्त करून श्री. सेठ म्हणाले,  पोलीस दलात क्रीडा संस्कृती विकसित होऊन खेळाडूंमधील एकोपा वाढीस लागेल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १३ संघ सहभागी होत असून १८ क्रीडाप्रकारांचा स्पर्धेत समावेश आहे. राज्यातून २ हजार ५९० खेळाडू सहभागी झाले आहेत.  पोलीस दलातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य, खेळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आह

एल एम एस तर्फे खेडमध्ये दिनांक सहा व सात जानेवारी 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल राजगुरुनगर येथे खेड व मावळ तालुका यांच्या स्पर्धा संपन्न

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख खेड :  इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्पर्धेचे आयोजन केले बजाज ऑटो लिमिटेड आणि एल एम एस स्पोर्ट फाउंडेशन यांनी या स्पर्धेचे नियोजन केले या स्पर्धेत कबड्डी कबड्डी खो-खो रीले रसिखेच या स्पर्धा घेण्यात आल्या निकाल पुढीलप्रमाणे , कबड्डी प्रथम क्रमांक वसंतराव मारोतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी द्वितीय क्रमांक रामभाऊ माळगे विद्यालय कडूस तृतीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय राजुर नगर चतुर्थ क्रमांक शिवाजी विद्यामंदिर चाकण मुले प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर शिवाजी विद्यामंदिर चाकण तृतीय क्रमांक वसंतराव मारोतराव मांजरे विद्यालय मांजरेवाडी चतुर्थ क्रमांक श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी खो खो मुली साजिनाथ महाराज विद्यालय वडमुखवाडी रामभाऊ परळीकर विद्यालय तळेगाव दाभाडे तृतीय क्रमांक श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय बाबुराव चतुर्थ क्रमांक श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण मुले प्रथम क्रमांक रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय तृतीय क्रमांक रामभाऊ परळीकर विद्यालय त

चाकण येथे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / सोहम भगत   चाकण दि. ६, चाकण येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्थेच्या सभागृहात स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, शहर प्रमुख महेश शेवकरी, जमीर काझी, चाकण पतपेढीचे चेअरमन राहुल परदेशी, उपनगराध्यक्ष ॲड.प्रकाश गोरे,सोसायटीचे सर्व आजी माजी चेअरमन, संचालक तसेच बाजार समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या तैलचित्राचे सौजन्य युवा इन्फ्रास्ट्रकचर्स हे होते. यावेळी सूत्रसंचालन अशोक जाधव व आभार सोसायटीचे मा. चेअरमन गोरक्षनाथ कांडगे यांनी केले.

जि.प.प्राथ.शाळा-थिगळस्थळ ची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुडझेप

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क    प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर         31जुलै 2022रोजी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा थिगळस्थळ ने दैदिप्यमान यश संपादन केल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सातकर यांनी सांगितले. शाळेतील आर्या प्रकाश थिगळे हिने २८०गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत शहरी विभागात ९वा क्रमांक प्राप्त केला असून शाळेतील अजून १५विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.  प्रज्ञा योगेश माळशिरसकर २७६गुण , प्रसाद विश्वास ओव्हाळ २७६गुण, कार्तिक विकास मनकर २७०गुण, अनुष्का सुनील धंद्रे २६८ गुण, वेदिका आत्माराम शिंदे २६२गुण,श्रेयाली बाबाजी कोरडे २६०गुण, संस्कृती काळूराम ठाकूर २५४गुण, संचिता गणेश सांडभोर २४८गुण, अथर्व अरविंद पारधी २४६गुण, सायली शरद भोकसे २४०गुण, आदित्य शरद ठाकूर २३८गुण, धनश्री काशिनाथ बागुल २३८गुण, सिद्धेश सुधीरकुमार गोसावी २३६गुण,मयूर संजय गोरख २३४गुण व आर्यन पांडुरंग जैद २३२गुण असे थिगळस्थळ शाळेचे  एकूण १६ विद्यार्थी यावर्षी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका सुचिता दौंडकर - कराळे तसेच सहकारी शिक्षक अनुराधा बोरकर, महादू राळे

रेड, बेलदारवाडी जि. प. शाळेचे वनभोजन उत्साहाट संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी -रणजित चव्हाण  शिराळा : जि प शाळा रेड, बेलदारवाडी शाळेचे वन भोजन म्हसोबा मंदिर रेठरे धरण या ठिकाणी संपन्न झाले.सर्व विद्यार्थ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास बेलदारवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील व उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, ग्रामसेवक प्रमोद माळी, लोकप्रतिनिधी सुधीर बिळासकर, राजेंद्र घारगे. अंगणवाडी रेड व बेलदारवाडी अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होत्या. भरारी पथकाचे खोत व गायकवाड सर उपस्थित होते. सदर परिसर चिमुकल्याच्या आवाजाने गजबजून गेला . गोष्टी, गाणी, बडबड गीते विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परिसरातील विविध गोष्टींचे निरीक्षण करण्यास सांगितले. सर्वांनी चुलीवरच्या भोजनाचा मनमुराद आनंद लुटला. रेड शाळेचा मुख्याध्यापिका पूजा विभुते, वैशाली कारंडे, बेलदारवाडी शाळेचे मुख्याध्यापक अमोल जाधव,  शिक्षक तानाजी कदम उपस्थित होते.

बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवून महाराष्ट्र सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे सह-संस्थापक आणि कायदेशीर सल्लागार यांच्यावर आयपीसी सेक्शन ४२०,५०५ आणि ११४ अन्वये गुन्हा दाखल

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि.२६, रॅपिडो बाईक टॅक्सीचे सह-संस्थापक अरविंद सांका आणि कायदेशीर सल्लागार शंतनू शर्मा यांना पुणे शहर पोलिसांनी बेकायदेशीर बाइक टॅक्सी चालवण्याप्रकरणी आणि संबंधित कर न भरून महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची  फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार, रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप चालवणारी कंपनी रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध २४ नोव्हेंबर रोजी बंड गार्डन पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. भारतीय दंड संहितानुसार  कलम 420, 505, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ अधिकाऱ्याच्या पुरवणी निवेदनानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. २६: ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे प्रबंधक एस. एम. अबूज यांनी दिली. ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे येथे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयाने तसेच पुणे डी.आर.टी. बार असोशिएशनच्या सहकार्याने शनिवारी (२४ डिसेंबर) लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयाचे उद्घाटन ऋण वसुली अपिलीय न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष तथा केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक मेनन आणि पुणे ऋण वसुली न्यायाधिकरणाचे पिठासीन न्यायाधीश तथा निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिलीप मुरूमकर यांच्या हस्ते करण्यात आले.  या लोकन्यायालयामध्ये १ हजार ३८ खटले तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३० खटले तडजोडीने मिटविण्यात यश आले. या तडजोडीतून बँकाची एकूण ६०४ कोटी रूपयांची वसुली झाली आहे. त्यापैकी एक खटल्यामध्येच १४९ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.  या लोकन्यायालयामध्ये न्यायाधिशांचे ५ पॅनेल तयार करण्यात आले होते. त्यामध्ये पॅनेल प्रमुख म्

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि २६:  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.   दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्

तृतीयपंथीयांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि.२६: समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. भवानी पेठ येथील संत ज्ञानेश्वर समाज मंदिर येथे आयोजित या शिबिर कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, मनपा क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तालुका समन्व्यक मंगेश गाडीवान, सोस्वा ट्रेनिंग इन्स्टिट्युट व तृतीया फाऊंडेशन पुणेचे सदस्य, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या प्रेरणा वाघेला, आशिका पुणेकर, कादंबरी, मित्र क्लिनिकचे मधु गुरु आदी उपस्थित होते.   यावेळी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर म्हणाल्या, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यामध्ये राज्यात पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्यात आतापर्यंत ३४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.   तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क व  त्याचे महत्व सांगून जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी करावी. तसेच https://transgender.dosje.gov या पोर

पिंपरी-चिंचवडच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या म्हणजेच सोमवारी (दि.२६)  सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.  नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या सभेसाठी महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.