आढले खुर्द येथे कविवर्य विठ्ठल दळवी यांच्या कार्याचा गौरव

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील आढले येथे कोथुर्णे गावचे सुपुत्र विठ्ठल दळवी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत गौरविण्यात आला.  त्यांनी अभंग व पोवाडे च्या रुपात महाराष्ट्राची परंपरा व अस्मिता  जपत संत विचारांतून समाजाला एक वेगळी दिशा देणारे पुरोगामी विचारांचा वसा व वारसा जपणारे संत विचारांशिवाय समाजाला पर्याय नाही यासाठी पुन्हा संत व शिव विचारांची समाजाला गरज आहे,  जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येईल तेव्हा तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा आधार घ्यावा लागेल. तेव्हाच मानव पृथ्वीवर सुखाने जगेल व जो ग्रंथांचा अभ्यास करेल  तोच पृथ्वीवर तरेल व संतांचा महिमा किती महान आहे याची प्रचिती आणून दिली. 

यावेळी ऋषिकेश येवले किसन जगदाळे समीर राक्षे व  समस्त ग्रामस्थांच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात