राजगुरुनगर मधील बालनाट्य प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क राजगुरुनगर दि.२५ (प्रतिनिधी - योगेश माळशिरसकर) सोहम नाटय संस्था व स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला राजगुरूनगर आयोजित राजगुरूनगर मध्ये ६ ते १४ वयोगातील विद्यार्थ्यासाठी पहिले बालनाट्य प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादासह नुकतेच दि. ७ मे ते २१ मे या दरम्यान पार पडले . यासाठी एकूण ४० मुलांनी शिबिरात सहभाग नोंदवला.नाटक आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर दिग्दर्शक,संगीतकार, व्हॉईस आर्टिस्ट यांनी नाट्य कलेची विविध माहिती ,नाटकाचे प्रकार , प्रात्यक्षिकांसह मुलांना मार्गदर्शन केले. १५ दिवस चाललेल्या या शिबिराची सांगता रविवार (दि.२१ मे)रोजी समतानगर,वाडा रोड वरील सारा इंटरनॅशनल स्कूल येथे देवाची फुलं,वेडात मराठे वीर दौडले सात,राजहंस,मूकनाट्य Mime Act,अप्पर डिप्पर या नाटकांच्या सादरीकरणाने झाली. या शिबिरासाठी प्रतिक खिसमतराव,डॉ.नीलम गायकवाड,डॉ.शीतल ढवळे - खिसमतराव ,डॉ.कुंतल जाधव या आयोजकांनी राजगुरुनगर मध्ये प्रथमच एक आगळावेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .