अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे दि.5: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १ हजार ४०० गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी १ वर्षाकरीता जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


 राज्यातील अनुसूचित जातीमधल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण मिळावे याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या निर्देशानुसार हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या एकूण ७ विभागीय ठिकाणी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर व बार्टीच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती.


ऑनलाईन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ७ विभागीय ठिकाणी प्रशिक्षण वर्ग सुरु व्हावी यासाठी  संबंधित विभागाला आवश्यक प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात