पोस्ट्स

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

इमेज
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शाळा बंद राहणार आहे.  राज्यव्यापी शाळा बंदचा पुण्यातून एल्गार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे.  येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे; उद्योगधंद्ये वाढीच्यादृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण निर्मिती करीता पोलीस दलाने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  चिखली येथील पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्...

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

इमेज
पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरात गुरुवारी अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर यासह अनेक पेठांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्हचे व मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणी जपून वापरावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

Sangali : ट्रॉली पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावली... इतक्यात भरधाव..... एकाचा जागीच मृत्यू

इमेज
  सांगली (प्रतिनिधी): पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे कराड-तासगाव महामार्गावर ट्रकने टॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टॅक्टर चालकासोबत असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात काल रविवार (दि.१९) रोजी घडला. अवधूत विनायक सदामते (वय-२२, रा- देशिंग, ता- कवठेमहांकाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत टॅक्टर चालक महादेव शिवाजी चव्हाण (वय-४३, रा- लक्ष्मीनगर, पलूस) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ट्रॅक्टर (क्र. एमएच १० डीजी १४७८) व दोन ट्रॉलीमध्ये (क्र. एमएच १०ईके १३४४ व एमएच १० ईके १३४५) महादेव चव्हाण व अवधूत सदामते जात होते. यावेळी ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने सांडगेवाडी येथे कराड- तासगाव महामार्गावर डाव्या बाजूला चव्हाण यांनी ट्रॅक्टर-ट्रॉल्या उभ्या केल्या. चालक महादेव चव्हाण पंक्चर काढण्यासाठी दुकानदाराला बोलाविण्यास गेले. यावेळी अवधूत सदामते ट्रॅक्टर जवळ थांबला होता. यावेळी पहाटे पलूसकडून तासगावच्या दिशेने बगॅस घेऊन निघालेल्या ट्रकने (क्र. एमएच ४६ एएफ १८३२) रस्त्याकडेला उभ्या असलेल्या य...

शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १५ : - शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.  'सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली. या कार्यक्रमास कृषिमंत्री धनंजय मुंडे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, कृषि आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय ...

लोकसभेसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; नितीन गडकरी, पंकजा मुंडेंचाही समावेश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी हिना गावित – नंदुरबार सुभाष भामरे – धुळे स्मिता वाघ – जळगाव रक्षा खडसे – रावेर अनुप धोत्रे – अकोला रामदास तडस – वर्धा नितीन गडकरी – नागपूर सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर प्रतापराव चिखलीकर – नांदेड रावसाहेब दानवे – जालना भारती पवाण – दिंडोरी कपिल पाटील – भिवंडी पियूष गोयल – उत्तर मुंबई मिहिर कोटेचा – मुंबई उत्तर पूर्व मुरलीधर मोहोळ – पुणे सुजय विखे पाटील – अहमदनगर पंकजा मुंडे – बीड सुधाकर श्रृंगारे – लातूर रणजीत सिंह नाईक निंबाळकर – माढा संजयकाका पाटील – सांगली

रवींद्र वायकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि.१०, शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे मंचावर होते.रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर ; आमदार कल्याणशेट्टींच्या मागणीला यश

इमेज
अक्कलकोट (दि. १०), अक्कलकोट, जेऊर ,तडवळ, कोर्सेगाव मार्गे बरूर ते विजापूर रोड जोडणारा या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर होऊन निविदा प्रसिद्ध झाली आहे. उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आग्रही मागणी करून देगावं एक्सप्रेस कॅनॉलच्या 400 कोटींच्या कामाच्या मंजुरीनंतर आता पुन्हा तब्बल 270 कोटी रुपयांचे हे काम मार्गी लागले आहे. सदर रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकरी बांधवाना दुग्ध व शेती उत्पादने तसेच कृषिपूरक उत्पादने बाजारपेठेत पाठविणे करीता दळणवळण सुविधा म्हणून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तसेच तेलंगणाच्या हैद्राबाद तसेच बिदर,कलबुर्गी या कर्नाटकाच्या भागाला जवळच्या अंतराने जोडणारा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांच्या मध्यमातून जोडणारा महत्वाचा ठरणार आहे.  शिवाय अक्कलकोट मतदारसंघातील नागरिकांची 30 वर्ष्यापासूनची असलेली इच्छा पूर्ण करण्यात हातभार लागला तसेच तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागता आला याचे वेगळेच समाधान आहे.अक्कलकोटच्या दक्षिण भागात देग...

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.             राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन ; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इमेज
मुंबई दि.२३, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मानले जाणारे मनोहर जोशी  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर

इमेज
पुणे दि.२१, (प्रतिनिधी - दयानंद गौडगांव) भा रतीय  जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची  जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहर चिटणीस नामदेव ढागे, संजय मंगोडिकर, राजू दुर्गे, शीतल शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व संयोजक तुषार हिंगे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शाकिर शेख, कामगार प्रकोष्ठ नामदेव पवार, सांस्कृतिक प्रकोष्ठ विजय भिसे, किसान मोर्चाचे गुलाब बनकर, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. प्रताप सोमवंशी, दिव्यांग सेलचे शिवदास हांडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रिती कामतीकर, वाहतुक सेलचे दीपक मोढवे पाटील, जैन प्रकोष्ठ संदेश गादिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.  भाजपा युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे! उमेश सांडभोर, भूषण गायके, अक्षय कामठ...

आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांचा आकस्मिक निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३१, आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते निमोनिया या आजाराशी झुंज देत होते. मात्र आज त्यांना मृत्यू झाला.  दरम्यान आ. बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.  अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.   खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये आ. बाबर यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी  अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी --हरि बोंबले प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाला. या स्पर्धेत व्यायाम शाळेतील सर्व पुरुष व महिला एकूण दोनशे सभासंदानी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांला रेंजर सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते . पुरुष गटात प्रथम क्रंमाक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी पटकावलातर महिला गटात सोनाली संदिप गाडे यांनी मिळविला तर सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिह्न देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर यांनी केले तर स्पर्धा आयोजन वक्रतुड फिटनेसचे सर्वेसर्वा विकासशेठ वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसचलन कैलास दुधाळे यांनी केले तर आभार संपत गारगोटे यांनी केले.

पुण्यातील वेळअमावस्या स्नेह भोजनास आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुनिभाऊ कांबळे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्तिथी ; बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांचा सलग 17 वर्षाचा विक्रम

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे (प्रतिनिधी) - बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. गेल्या १७ वर्षापासून पुण्यातील अक्कलकोट चे रहिवासी साठी वेळ अमावस्याचा  कार्यक्रम नित्य नियमाने दर वर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे  आणि पुणे कॅन्टोमेंट चे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येवून आपली उपस्थिती दर्शवली व एकत्र च या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजोरो च्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला मंडळीनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळ जवळ ४००० लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.  हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्द केल्याबद्दल मा. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडून आयोजकवरती कौतुकाचा वर्षाव झाला.कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक गा...

शिवरायांच्या मावळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवला पाहिजे - संपत गारगोटे* प्रतिनिधी--लतिफ शेख राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख, राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन  येथिल प्रत्येक तरुणाने  यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा  तसेच  इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून  प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे  यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील  महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना  मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर  राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी  संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन  स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांन...

राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण ; १ कोटी ६० लाख रुपये अनुदान वाटप

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई दि.२३ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्व संमती दिली असून त्यामधील  ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.             छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत राज्यात ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कोकण विभागात १४९ ,  नाशिक विभागात १ हजार ७० ,  पुणे विभागात २ हजार ९०७ ,  कोल्हापूर विभागात ७०८ ,  छत्रपत...

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क निगडी, दि. २२ , (प्रतिनिधी / दयानंद गौडगांव) : अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीरामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य श्रीराम प्रतिमा पूजन तसेच दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ११.०० वाजता काॅलनीतील महिलांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला, त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी मनोरंजनात्मक  संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ठिक ८:३० वाजता प्रसिद्ध उद्योजक आदेश नवले यांच्या हस्ते दिपोत्सव कार्यक्रम पार पडला. त्यानंतर श्रीराम प्रतिमेचा महाआरती करण्यात आली. आरती नंतर सर्व रामभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी उद्योजक आदेश नवले तसेच ज्ञानेश्वर वाल्हेकर यांचा सहकार्य तसेच आशिर्वाद व्यासपीठाला लाभला. यावेळी प्रतिष्ठानचे , शिवा फुलारी, नागेश सुतार, मल्लीनाथ कोरे, यल्लप्पा सुतार, तुकाराम अर्जुन, गोपी अर्जुन, बाशा मुल्ला, गंगाधर पुजारी, प्रभू फुलारी , खंडेराय बेलंगी यांच्या समावेत इतर कार्यकर्ते तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.

श्री क्षेत्र गुळाणी येथे श्री राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त पालखी सोहळा व भव्य मिरवणूक संपन्न

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी /  दत्ता भगत खेड :  तालुक्यातील श्री संत सटवाजी  बाबा येथील गुळाणी  गावांमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावामध्ये पालखी सोहळा व भव्य दिव्य अशी भक्तिमय वातावरणात जय श्रीराम अशा जल्लघोशात मिरवणूक संपन्न झाली. पालखी सोहळ्याची मिरवणूक संपूर्ण गावभर भगवे झेंडे व हरिनामाच्या गजरामध्ये उत्साही वातावरणात संपन्न झाली . गुळाणी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वात शेवटी मारुती मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती करून प्रसाद वाटप करून पालखी सोहळ्याचे समारोप करण्यात आला.

पहिले युवा मराठी साहित्य संमेलन ; अध्यक्षपदी नवनाथ गोरे यांची निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे ( प्रतिनिधी जयदीप वनशिव ) : राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून, संमेलनाचे उदघाटन आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ चंद्रकांत कुंजीर व निमंत्रक  ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी  दिली. संमेलनाध्यक्ष श्री गोरे यांच्या फेसाटी कादंबरी चा मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास क्रमात  समावेश करण्यात आला आहे, तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. वारुळ, मुराळी, सत्यघटना, रौंदाळ आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे, फेसाटी कादंबरी ला केंद्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.  दि. २८ जानेवारी रोजी पुणे येथील आंबेगाव पठारावर  पुणे केंब्रिज शिक्षण समुहाच्या प्रांगणात साहित्य संमेलन होत आहे,  सकाळी दहा वाजता ग्रंथ दिंडीला सुरवात होणार आहे, दुपारी १२ वाजता उद्घाटन समारंभाला प्रारंभ होईल.  प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी ...

रामनामात दंग झाले महाबळेश्वर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क           महाबळेश्वर ( प्रतिनिधी प्रशांत भोसले ) : पाचशे वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयोध्येमध्ये राम लला विराजमान झाले आणि कणाकणातील राम मनामनात रूजला!  शोभायात्रेद्वारे सूरवात झालेल्या कार्यक्रमातून राम नामाचा गजर झाला आणि असंख्य रामभक्तांचे बलिदानातून विराजमान झालेल्या आयोध्येतील रामललांची मोदीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा याची देही याची डोळा लाईव पाहून  सर्व रामभक्तांचे आयूष्य सार्थक झाले, श्रीराम जय राम जय जय राम या जपामध्ये महाबळेश्वर येथिल सर्व श्री राम भक्त गूंग झाले !  रामरक्षा स्त्रोतातून प्रभू श्रीरामांनी सर्व भक्तांची रक्षा करावी असे गार्‍हाणे प्रभूश्रीराम चरणी मांडण्यात आले.भजन व महाआरती द्वारे श्रींचरणी नतमस्तक होऊन महाप्रसाद घेऊन, संध्याकाळी घरोघरी दिपोत्सव साजरा करण्यात आला.