रवींद्र वायकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई, दि.१०, शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार पडला. रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते. रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरुन शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासोबत आज शिंदे गटाच प्रवेश केला. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे मंचावर होते.रवींद्र वायकर आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद