अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर ; आमदार कल्याणशेट्टींच्या मागणीला यश

अक्कलकोट (दि. १०), अक्कलकोट, जेऊर ,तडवळ, कोर्सेगाव मार्गे बरूर ते विजापूर रोड जोडणारा या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या 45 किलोमीटर लांबीच्या रस्त्यास 270 कोटी रुपये मंजूर होऊन निविदा प्रसिद्ध झाली आहे.



उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आग्रही मागणी करून देगावं एक्सप्रेस कॅनॉलच्या 400 कोटींच्या कामाच्या मंजुरीनंतर आता पुन्हा तब्बल 270 कोटी रुपयांचे हे काम मार्गी लागले आहे.

सदर रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर शेतकरी बांधवाना दुग्ध व शेती उत्पादने तसेच कृषिपूरक उत्पादने बाजारपेठेत पाठविणे करीता दळणवळण सुविधा म्हणून मराठवाड्यातील नांदेड, लातूर तसेच तेलंगणाच्या हैद्राबाद तसेच बिदर,कलबुर्गी या कर्नाटकाच्या भागाला जवळच्या अंतराने जोडणारा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांच्या मध्यमातून जोडणारा महत्वाचा ठरणार आहे. 

शिवाय अक्कलकोट मतदारसंघातील नागरिकांची 30 वर्ष्यापासूनची असलेली इच्छा पूर्ण करण्यात हातभार लागला तसेच तुम्हाला दिलेल्या शब्दाला जागता आला याचे वेगळेच समाधान आहे.अक्कलकोटच्या दक्षिण भागात देगाव एक्सप्रेसचे पाणी  मिळतो आहे आणि त्याला पूरक रस्ते तयार होत आहेत त्याने विकास पर्वाचा वेग आपोआप वाढणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात