मैंदर्गी येथील श्री. शिवचलेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिकेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



मैंदर्गी अक्कलकोट ( प्रतिनिधी शब्बीर मुजावर ) : दि.१३,  प्रशालेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवचलेश्वर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष तुकप्पा नागुर होते. यावेळी मंचावर प्राचार्य ए. एच. हरवाळकर, पर्यवेक्षक आर.डी.जाधव,एस.एस.केंगिनळ के. एम. आळंद, आर. एस. भालके, के. एम. आदटराव मॅडम. प्रमुख पाहुणे अ.कोट. ग्राहक पंचायत चे अध्यक्ष अभिजीत लोके  उपस्थित होते. 

प्रथमतः राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद तसेच सोलापूरचे चार हुतात्मे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात आर. एस. भालके मॅडम यांनी १२ जानेवारी दिनाच महत्त्व व या थोर राष्ट्र निर्मात्यांच योगदान व हुतात्म्यांचे बलिदानाची महत्ती विशद केले. यावेळी अभिजीत लोके सर  यांनी राष्ट्रीय युवा दिनाच औचित्य साधून विद्यार्थी ग्राहक प्रबोधन करताना सांगितले की विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे.तसेच आज फसवणूक जास्त होत आहे. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती ,वस्तु खरेदी करताना दर, मुदत तारीख, विस्तृत माहिती दिले.आजचा कार्यक्रम इ.८ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात