शिवरायांच्या मावळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवला पाहिजे - संपत गारगोटे* प्रतिनिधी--लतिफ शेख राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / लतिफ शेख,
राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले .
येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले.
यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा