माजी सैनिकांना संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ३:  माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी राज्य सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे.


राज्य सैनिक कल्याण विभागाच्या आदेशानुसार माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करतेवेळी डिस्चार्ज बुक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, निवृत्तीचेतन बँक खाते, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इसीएचएस कार्ड, राहत्या पत्त्याचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, लागू असल्यास नाव जन्मतारीख बदलाबद्दल पत्र आदी कागदपत्रे जवळ ठेवावीत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (निवृत्त) यांनी कळविले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात