आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांनी आयकर गणना विकल्प २७ ऑक्टोबर पर्यंत कोषागारात सादर करण्याचे आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि.१३ : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून आयकर नियमात बदल झालेला असून दोन पद्धतीने आयकर कपात करण्यात येणार आहे. जुनी कर प्रणाली स्वीकारण्याच्या स्लॅबमध्ये बदल झाले असून वित्तीय वर्ष २०२३-२४ साठी पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व आयकरपात्र निवृत्तीवेतनधारकांना जुन्या कर प्रणाली नुसार आयकर गणना करावयाची असल्यास त्यांनी त्यांचा विकल्प २७ ऑक्टोबर पर्यंत कोषागारात सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.
जुन्या आयकर प्रणालीचा विकल्प निवडलेल्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी आयकर कायदा १९६१ चे कलम ८०सी, ८० सीसीसी, ८०डी व ८०जी अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीचा तपशील आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करावा. ज्या निवृत्तीवेतन धारकांचे आयकरमुक्त गुंतवणुकीचे कागदपत्र वेळेत प्राप्त होणार नाहीत त्यांची नियमानुसार निवृत्तीवेतनातून आयकर कपात करण्यात येईल असेही वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
***
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा