भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ३१ : समाज कल्याण विभागाच्यावतीने भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत जिल्ह्यातील महाविद्यालयांची कार्यशाळा पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. 


कार्यशाळेमध्ये स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करुन प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या. सन २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंतचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, शैक्षणिक वर्ष सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचे अर्ज भरून घ्यावेत व शिष्यवृत्ती प्रलंबित असताना महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. 


महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्र अथवा शिष्यवृत्ती शाखेने विद्यार्थ्यांच्या महा-डीबीटी व स्वाधार योजनेसंदर्भातील शंकाचे निरसन तेथेच करावे. समाज कल्याण विभागाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात येतील, असे सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात