मावळ-मुळशी उपविभागात फटाक्यांच्या दुकानाजवळ फटाके उडविण्यास बंदी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १९ : मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या नियम ३३ (१) (ओ) (यु) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी मावळ-मुळशी यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्यादृष्टीने शोभेची दारू व फटाके साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करणे, कोणत्याही प्रकारचे दारू काम करणे, कोणत्याही प्रकारचे फटाके उडवणे या सर्व गोष्टीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
शोभेच्या दारू रॅकेटचे परिक्षणदेखील या परिसरात करता येणार नाही. सदर आदेश मावळ-मुळशी उपविभागात ३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील,असे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा