सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्याच्या प्रशासनाच्या सूचना

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. २०: जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय स्वच्छ, सुंदर व नीटनेटके करण्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयात ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.


स्वच्छता अभियान राबविण्याबाबत  दूरदृष्यप्रणाणीद्वारे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्याल, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

 कदम म्हणाल्या, कार्यालयातील वातावरण स्वच्छ असल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा प्रशासनास तसेच नागरिकांला लाभ होतो. पर्यायाने प्रशासन उत्तरदायी, सुलभ, पारदर्शी आणि गतिमान होण्यास मदत होते. याचा विचार करता कार्यालयीन स्वच्छता अभियान राबविण्याची कार्यवाही करावी. 


कार्यालयीन वस्तू, दस्तऐवज, कपाटे सुस्थितीत ठेवावेत. कार्यालयांच्या इमारतीच्या भिंतींचे रंगरंगोटीचे काम करुन घ्यावे. स्वच्छतागृहांचे दरवाजे, कडी-कोयंडा, आवश्यक विद्युत तारांची दुरुस्ती करून घ्यावी. प्रसाधनगृह, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करावी. बगीच्यातील हिरवळीची नीट कापणी करुन घ्यावी.


कार्यालयातील मोडके फर्निचर, रद्दी आदींची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. टेबलाच्या आजूबाजूला कागदांचे ढिग, नस्तींचा गठ्ठा, सुटे कागद, अनावश्यक प्लॉस्टिक बाटल्या, चहाचे कप आदी ठेवू नयेत. अभ्यागतांसाठी स्वतंत्र बैठक कक्ष तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  करावी.  महिलांसाठी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.


कार्यालयीन अभिलेख किंवा दस्तावेज सुस्थितीत लावून घ्यावेत. अभिलेखांचे अ, ब, क, ड वर्गीकरण करुन कालबाह्य अभिलेखे नियमानुसार नष्ट करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना  कदम यांनी दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात