'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे गुरुवारी उद्घाटन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'चे गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वा. दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत राज्यात एकूण ५११ ग्रामपंचायतीची निवड करण्यात करण्यात आली आहे.  यामध्ये जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, शिरुर, वेल्हे या तालूक्यातील एकूण ३० ग्रामपंचायतीअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदविकाधारकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.


जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागरिकांनी नजीकच्या प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात