शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह संस्थेचा प्रवेशित सूर्यकांत पाटील यांची समाजसेवा अधीक्षकपदी नियुक्ती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १२: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह, येरवडा या संस्थेचा प्रवेशित सूर्यकांत पाटील यांची समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी सहआयुक्त राहूल मोरे, उपआयुक्त वर्षा पवार, सहाय्यक आयुक्त अश्विनी कांबळे, येरवडा शासकीय अनुरक्षणगृह अधीक्षक विद्यासागर कांबळे उपस्थित होते.


श्री. पाटील हे अनाथ असून त्यांनी नांदेड जिल्ह्यात हांगरगा  येथील बालगृहातून २०१३ मध्ये पुणे येथील शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह येरवडा येथे प्रवेश घेतला. सन २०२२ मध्ये शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करून विभागातर्फे त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे त्यांना अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाला. 


 श्री. पाटील यांचे महिला व बालविकास विभागाच्या संस्थेत संगोपन झाले.  त्यांनी येथे शिक्षण घेत बी.ए, एम.एस.डब्लू. ही पदवी उत्तीर्ण केली. सन २०१८ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. सोबतच ते विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होते.  अनाथ आरक्षणाचा लाभ आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत त्यांची समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) या पदी नियुक्ती झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात