राज्यात २१ हजार बोगस सीमकार्ड ; पोलिसांच्या कारवाईत समोर आली धक्कादायक आकडेवारी, एका व्यक्तीच्या नावावर इतकेच सीम कार्ड वापरता येते
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे दि. ४, मोबाईलसाठी कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड घेताना दूरसंचार विभागाने काही मर्यादा घातली आहे. यानुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास अशा ग्राहकांची सेवा खंडित करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. मात्र असे असतानाही एका व्यक्तीच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल 21 हजार बोगस सिमकार्ड वितरित झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीला आपल्या आधार कार्डवर एकूण 9 सिम घेता येतात. पण, हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी अनधिकृतपणे अनेक सिमकार्डही घेतली आहेत. मात्र, याबाबत मुख्य आधारकार्ड धारकाला याची माहिती नसते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा