पुणे शहरात रविवारी 'माझी माती माझा देश' उपक्रमाची सांगता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. १९: पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. 


केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' हे अभियान पुणे शहरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात