सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीना १३ लाख ५० हजारांचा दंड ; बीडीओंना नोटीसा जारी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीना १३ लाख ५० हजारांचा विभागीय आयूक्त कार्यालयाकडून दंड ठोठविण्यात आला आहे. दंडवसूली संदर्भात ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चीत करण्यात आली असून बीडीओंना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहीती नुसार स्थानिक लेख परिक्षण विधीत कालावधी मध्ये पूर्ण केला नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चपळगाववाडी ,भोगाव ,गुळसडी ,देलवडी ,बोळकवठा ,पिंपळगाव (धस) पिंपळगाव पान , उपळाई खुर्द, टाकळी टेंभूर्णी ,कोळेगाव ,मेथवडे , घुंगरेगाव ,मलवंडी ,शिरापूर मोहोळ , हातीज , पाडळी , तिन्हे ,मुंगशी आर , निमगाव (ह) रामवाडी ,मांगी, धोत्री , कुडल , कोर्सेगाव, रामपूर (इ ) ,आष्टी , घारी ,सांगवी , चुंगी, लव्हे , धर्मगाव, बोरेगाव , वाघोली, चळे, रानमसले , बुरंगेवाडी , दिंडूर , टेंभूर्णी , वरवडे , वाफळे , मालेगाव (आर ), वटवटे , हिसरे, अळसुंदे , रुई ,कळंबवाडी , रास्तापूर ,मालेगाव ,श्रीपतपिंपरी शेंडगेवाडी, रेवेवाडी , कासेगाव, सूपली ,आशी प्रत्येकी २५ हजार रूपयांचा दंड ठोठविण्यात आल्याची माहीती ग्रामपंचायात विभागाने दिली आहे. वेळेत दंड नाही भरला तर केंद्र शासनाचे मिळणारे अनुदान कपात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ग्रामपंचायत विभागाकडील ५६१ अफरातफर प्रकरणांत गुंतलेली १ कोटी ११ लाख ५३ हजार ५१२ रुपयांची वसुली व समायोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेनी ८८० ऑडीट पॉईंटची पडताळणी करून एक कोटी रुपयाची रक्कम वसूल केल्याचा दावा केला आहे.
प्रलंबित अपहार प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेने अहवाल सादर करण्यासाठी संबंधित कालावधीचे ग्रामपंचायत स्तरावरील प्रमाणके, रोजकीर्द, हजेरीपत्रक, मूल्यांकन दाखले वसुलीच्या पावत्या अशी सर्व अनुषंगिक दप्तर उपलब्ध होत नसल्याची माहीती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५४ ग्रामपंचायतीना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून हेरींग घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा