चिंचवड येथे 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमाचे २२ ऑगस्ट रोजी आयोजन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १९: 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगाची नाव नोंदणी, मार्गदर्शन, योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत संवादही साधण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा