सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


प्रतिनिधी / दयानंद गौडगांव 



पिंपरी-चिंचवड दि. ११, जुन्या पुणे मुंबई महामार्गावर असलेल्या सोमाटणे टोलनाक्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.  सोमाटणे टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी गुरुवारी टोलनाका हटाव कृती समितीने तळेगाव बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.  मात्र त्याने काही तोडगा न निघाल्याने टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने कालपासून (शनिवार दि.११)  बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आला आहे.

             जोपर्यंत टोलनाका बंद होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा निर्धार कृती समितीने केला आहे. या उपोषणास मावळ तालुक्यातील ३० पेक्षा अधिक गावांनी पाठिंबा दर्शविला आहे. गुरूवारच्या तळेगांव (दाभाडे) बंदला देखील १०० टक्के प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा आंदोलन सर्व मावळ वासियांना मानला जात आहे. परिणामी टोलनाका हटाव समितीला आणखीन बळ मिळाल्याचं पहायला मिळत आहे. 

           सोमाटणे टोलनाका हे अनधिकृत असून त्यावर होणारी जनतेची फसवणूक थांबली पाहिजे अशी मागणी टोलनाका हटाव कृती समितीची आहे. दरम्यान आय आर बी आणि एम एस आर डी सी कडून आलेल्या अधिकाऱ्यांनी कृती समितीच्या उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. वरीष्ठांशी संपर्क साधून यावर लवकरात लवकर तोडगा काढू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात