नागणहळ्ळीतील संपादित जमिनीची नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही सुरु

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


सोलापूर, दि. 28, अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट- महाराष्ट्र कर्नाटक सीमा (सोलापूरच्या स्पर कनेक्टिविटीसहीत) कि.मी. 418/800 ते 547/000 करिता संपादनाची कार्यवाही चालू आहे. सदर महामार्गाअंतर्गत येणाऱ्या मौजे नागणहळ्ळी (ता.अक्कलकोट) या गावातील संपादित होणाऱ्या जमिनीच्या अंतिम निवाडा मंजूर करण्यात आला असून, नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जाण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 1) सोलापूर यांच्याकडून तलाठी यांच्यामार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच, वाढीव क्षेत्राची नव्याने कलम 3 (A) अधिसूचना प्रसिध्द करुन नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 

मौजे नागणहळ्ळी येथील जमीन गट नं. 82 मधील 0.1417 चौ.मी. इतके क्षेत्र संपादित होत असल्याबाबत दि. 26/04/2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. जमिनीची प्रत्यक्ष मोजणी केली असता मोजणी विवरणपत्रानुसार गट नं. 82/1 या जमिनीचे 0.0100 चौ.मी. व गट नं.82/2 या जमिनीचे 0.1500 चौ.मी. इतके क्षेत्र बाधित होत असल्याचे निदर्शनास आले. सदर जमिनीचे कलम 3 (A) नुसार जमीन गट नं. 82/1 क्षेत्र 0.0008 चौ.मी. निवाडा जाहीर करण्यात येऊन त्याप्रमाणे गट नं.82/1 क्षेत्र 0.0008 चौ.मी. साठी नुकसान भरपाई रकमेची परिगणना करण्यात येऊन नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

  कलम 3(A) मधील अधिसूचनेनुसार प्रत्यक्ष मोजणीमध्ये जमीन गट नं.82/1 च्या संपादन क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याने 0.0092 चौ.मी. इतक्या वाढीव क्षेत्राचे नव्याने कलम 3 (A) अधिसूचना प्रसिध्द करुन नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात