आदर्श शिक्षक शांताराम बाबुराव खेसे यांचे दुःखद निधन ; रयत शिक्षण संस्थेत शोककळा

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

प्रतिनिधी  / उत्तम खेसे 



राजगुरूनगर दि.२६,  शांताराम खेसे हे रयत शिक्षण संस्था या मोठया संस्थेत वाघेळे ता . शिरूर या संस्थेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत होते . स्वतः बीएस्सी बी पी एड् असून क्रिडा , गणित , विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत होते . त्यांच्या मार्ग दर्शनातून अनेक विद्यार्थी खेळात जिल्हा , राज्य पातळीपर्यत घडले . अवघड गणित, विज्ञान विषयाचा दरवर्षी १०० % निकाल एस.एस. सी . बोर्ड  या वर्गाचा लावत असे . त्यांना जिल्हाआदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान झाला होता . २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी राजगुरूनगर पॅथॅलॉजी लॅब मध्ये शुगर, युरीन टेस्ट करण्यासाठी गेले असता , युरीन घेण्यासाठी बाथरूम मध्ये गेले तेथेच त्यांना भोवळ येऊन खाली कोसळले . त्यानंतर हॉस्पिटल मध्ये नेले चेंकिग केले असता त्यांची प्राणज्योत मालविली होती . एक नावाप्रमाणे शांत, संयमी , हुशार शिक्षक हरपला . शैक्षणिक क्षेत्रातील चौकोनी चिरा, आदर्श नेतृत्व, कर्तृत्व काळाच्या पडद्याआड गेल त्यामुळे राजगुरूनगर शहरात दावडी गावात हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली , एक भाऊ , दोन बहीनी , एक पुतण्या असा परिवार आहे . ते अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष / राज्य समिती सदस्य उत्तमराव खेसे यांचे घरभाऊ होते . कै . शांताराम खेसे सर यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम १ मार्च २०२३ , बुधवार रोजी . महालक्ष्मी मंदिर मागे तळ्याच्या काठी दावडी या ठिकाणी स .८वा . होईल .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात