आढले खुर्द येथे कविवर्य विठ्ठल दळवी यांच्या कार्याचा गौरव
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील आढले येथे कोथुर्णे गावचे सुपुत्र विठ्ठल दळवी यांना त्यांच्या कार्याची दखल घेत गौरविण्यात आला. त्यांनी अभंग व पोवाडे च्या रुपात महाराष्ट्राची परंपरा व अस्मिता जपत संत विचारांतून समाजाला एक वेगळी दिशा देणारे पुरोगामी विचारांचा वसा व वारसा जपणारे संत विचारांशिवाय समाजाला पर्याय नाही यासाठी पुन्हा संत व शिव विचारांची समाजाला गरज आहे, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येईल तेव्हा तेव्हा भारतीय पुरातन संस्कृतीचा आधार घ्यावा लागेल. तेव्हाच मानव पृथ्वीवर सुखाने जगेल व जो ग्रंथांचा अभ्यास करेल तोच पृथ्वीवर तरेल व संतांचा महिमा किती महान आहे याची प्रचिती आणून दिली.
यावेळी ऋषिकेश येवले किसन जगदाळे समीर राक्षे व समस्त ग्रामस्थांच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा