अखेर अंगणवाडी सेविकांच्या मागणीला यश ; पगारवाढीसह पेन्शनचा ही लाभ मिळणार ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई दि.२८,  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान आज सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. तर अंगणवाडी सेविकांनाही दिलासा देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला.

अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी अनेकवेळा अंगणवाडी सेविकांनी आंदोलनही केले. तर मागील तीन दिवसांपासून राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत.

या पार्श्वभूमीवरच सरकारने अंगणवाडी सेविकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांना दिड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अजूनही त्यांच्या काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन देखील सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच मानधन आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणीही अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात