वाल्हेकरवाडीत शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्साहात

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / दयानंद गौडगांव 





निगडी दि.१९ , अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती वाल्हेकरवाडीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शिवभक्त प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते हे सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील (कन्नड भाषिक) आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या थाटात शिवजयंती साजरा करुन साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे.



              या शिवजयंतीला राजकीय, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चिंचवडे ,  आदेश नवले, ज्ञानेश्वर वाल्हेकर आदी उपस्थित होते.

               या शिवजयंती उत्सवा दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठान चे संस्थापक- नागेश सुतार, अध्यक्ष- मल्लीनाथ सुतार, उपाध्यक्ष -मल्लिनाथ कोरे , सचिव- बाशाभाई मुल्ला, शिवा फुलारी, गोपी अर्जून, गंगाधर गुरव, धनराज पुजारी आदिंनी परिश्रम घेतले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात