जि.प.प्राथमिक शाळा -ठाकरवाडी वेताळे शाळेस एनप्रो इंडस्ट्रीज लि.पुणे व रोटरी क्लब ऑफ निगडी ,कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांचे कडून साहित्य वाटप
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / योगेश माळशिरसकर
राजगुरुनगर दि.१२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी वेताळे या शाळेस एनप्रो इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे, रोटरी क्लब ऑफ निगडी - पुणे, कर्वे समाजसेवा संस्था पुणे यांच्या वतीने अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यामध्ये,
१. ई-लर्निंग व सोलर संच
२. पिण्याच्या पाण्याची १५०० लिटर पाण्याची साठवणूक क्षमतेची टाकी , लोखंडी स्टँड व संपूर्ण प्लंबिंग
३. कृतियुक्त शैक्षणिक साधने
४. शालेय परसबाग
५. वृक्षारोपण
६. २ के.व्ही. क्षमतेचे सौरउर्जा
संच युनिट
७. सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन
इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
कडूस, दोंदे , वेताळे, सायगाव या ग्रामपंचायत क्षेत्रातील १४ ठाकर वस्त्यांमध्ये ग्राम समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी क्षेत्रातील ठाकर वस्त्यांसाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत शाळेस या सुविधा उपलब्ध करत देण्यात आल्या. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व कामाचे मान्यवरांनी कौतुक केले. समाजातील लोकांनी विकासात्मक कामामध्ये स्वतःहून पुढे येऊन आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्या साठी योगदान देणे गरजेचे आहे तसेच आदिवासी समाजातील महिला व पुरुषांनी समाज विकासात पुढे येऊन उत्स्फुर्त सहभाग घेणे गरजेचे आहे , असे मत कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक महेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी श्रीकृष्णा करकरे मॅनेजिंग डायरेक्टर - एनप्रो इंडस्ट्रीज पुणे, मा. प्रणिता अलुरकर - प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ निगडी, मा. महेश ठाकूर - संचालक सीएसआर सेल कर्वे समाजसेवा संस्था पुणे,
रणजीत सिंग - जनरल मॅनेजर एचआर ऍडमिन,एनप्रो इंडस्ट्रीज , कल्याणी कुलकर्णी - सीएसआर हेड एनप्रो इंडस्ट्रीज पुणे, रुचिका पवार - प्रकल्प समन्वयक, ग्रामसमृद्धी प्रकल्प, शुभम भालेराव व गणेश सूर्यवंशी - क्षेत्र समन्वयक ग्रामसमृद्धी प्रकल्प, जीवन कोकणे - गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खेड, आशा बोंबले - केंद्रप्रमुख वेताळे, बंडू बोंबले -सरपंच ग्रामपंचायत वेताळे, बाबाजी वाळूंज, कविता बोंबले, शुभांगी बोंबले, आदी मान्यवर व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सदानंद माळशिरसकर , सुत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर तळेकर, शालेय उपक्रमांचे सादरीकरण रामचंद्र गायकवाड तसेच विजयादेवी मेहेर व आभार प्रदर्शन राजेंद्र शिंदे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा