गोल्डन कार्ड काढणे शिबीरास लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


 प्रतिनिधी/ विशाल खुर्द



       शिराळा दि.२३,    शिराळा नगरपंचायत मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सन 2011 च्या जनगणनेच्या सर्व्हेक्षणानुसार शहरातील 2900 लाभार्थांची आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थी म्हणून केंद्र शासनाकडून निवड झाली असून गोल्डन कार्ड धारकांना दरवर्षी पाच लाखापर्यतचा आरोग्य विषयक उपचार मोफत मिळणार असल्याने शिराळा नगरपंचायत मार्फत आज दिनांक 23/01/2023 व दिनांक 24/01/2023 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्यापैकी दिनांक 23/01/2023  रोजी शिराळा शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर शिराळा , लक्ष्मी मंदिर, कदमवाडी रोड नवजीवन वसाहत शिराळा , इंदिरा गणेश मंडळ शिराळा , यादव हॉस्पिटल जवळ कॉलेज रोड, शिराळा , मारुती मंदिर होळीचे टेक शिराळा या 5 ठिकाणी आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून  एकूण 350 गोल्डन कार्ड काढण्यात आले आहेत. तरी उद्या दिनांक 24/01/2023 रोजीही सदरचे शिबिर चालू असून शहरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी, श्री.योगेश बाळकृष्ण पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात