इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / लतिफ शेख
खेड : इकोहोरायझन फार्मर कंपनी अंतर्गत सनएज केअर प्राईम मॉलचे राजगुरुनगर मध्ये सुरेखा मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे अध्यक्ष छगनजी राठोड अशोक तोडमल ,उद्योजक व प्रेरणादायी वक्ता ,मनोज कुमार ढगे , कृषी अधिकारी वैभव चव्हाण ,सर्जेराव पिंगळे , सतीश नाईकरे ,राष्ट्रपती पदक विजेते विठ्ठल भोर ,केशव बनकर , चेतन पोखरकर , साहेबराव सातकर , पत्रकार दत्ता भगत , रामदास रेटवडे, व आसपास गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
या मॉलमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्ट , हेल्थकेअर , सौंदर्य प्रसाधने ,आर्युवेदिक उत्पादने व 100% आयुर्वेदिक प्रॉडक्ट राजूनगरमधील लोंकाना प्राप्त होणार आहे . या कार्यक्रमाची दिप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर प्रेरणादायी वक्ते अशोक तोडणकर यांनी आपले विचार व्यक्त केले . व कंपनीचे अध्यक्ष छगन जी राठोड यांनी कंपनीचे तीन उद्दिष्टे सांगितली ती म्हणजे जमिनीला काळ्या आईला वाचवणे ,राष्ट्रप्रेम , व समाज जागृती , व महिला सबलीकरण , हे कंपनीचे उद्दिष्ट असून प्रामुख्याने रासायनिक खत वापरल्यामुळे अनेक आजारांचे मूळ आहे , सेंद्रिय खताचे वापर करून अनेक आजाराचे मूळ नष्ट करणे या उद्देशाने या मॉलमध्ये सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट मिळणार आहे असे विचार राठोड यांनी मांडले . जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेखाताई मोहिते यांनी आपल्या मनोगत मध्ये अशा मॉलची गरज आहे .तसेच आहारामुळेच अनेक रोग निर्माण होतात , शरीराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, यासाठी सेंद्रिय खताचा वापर करून ही काळाची गरज आहे असे गौरव उद्गार काढले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल भोर यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास दुधाळे तर आभार प्रदर्शन सर्जेराव पिंगळे यांनी केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा