जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी



पुणे दि.३-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.


बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते.


शासनाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  कामांना यापूर्वी स्थगिती दिली होती.  प्रत्येक कामांची पालकमंत्र्यांनी तपासणी करून मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात