राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणूकीत अल्प मतदान ; केवळ ५७ टक्केच मतदान
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / पाडुरंग खुटाळ
खेड दि.६ , राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रथमच पॅनेल पडल्याने निवडणूकीमध्ये रंगत वाढली. जुने संचालक की नवीन संचालक निवडूण येणार ह्याचे मतदारा मध्ये उत्सुकता वाढली आहे आज निवडणूक पार पडली. त्यात बँकेच्या १७ शाखापैकी १५ ठिकाणी २९ हजार २१९ सभासद मतदारांनी एकूण ६४ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी बघता ५७ टक्केच मतदान झाल्याची नोंद झाली आहे. बँकेच्या मतदान प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगू लागली आहे.
यात एकूण मतदानाची टक्केवारी बघता उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत सरळ लढतीत भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनलमध्ये चुरस पाहावयास मिळाली. परंतु या निवडणूकी मध्ये अल्प मतदाना मूळे कोणत्या पॅनलला व उमेदवाराला फायदा होईल असे सांगता येत नाही. यात दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे.
एकूण मतदान केंद्रे व झालेल्या मतदानाची आकडेवारी....
शिरूर -२०९पुणे -१३३आळंदी -१७५जुन्नर - ८०पाईट - १९५
देहू रोड - ५३२
कडूस -१८६१आळेफाटा -१००
मंचर - ३३४जुन्नर -७१पाबळ - २५७
नारायणगाव -६९०भोसरी - ७३९चाकण -२९८५म्हाळुंगे - २५२राजगुरूनगर - ८०२८
एकूण :- १६६४१
उद्या म्हणजेच ७ तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजनी चंद्रमा गार्डन कार्यालयात होणार असून कोणत्या पॅनेलचा विजय गुलाल उधाळणार हे राजगुरुनगर वासीय व मतदार पाहणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा