नगरपरिषदांना १५ कोटींचा निधी मंजूर ; खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


प्रतिनिधी/ विशाल खुर्द 



   शिराळा दि.२२,  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांना निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे निधी विषयी मागणी केली होती.या मागणीला यश मिळाले असून रुपये पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

    दरम्यान,राज्यातील नगरपरिषदांना "वैशिष्ट्यपूर्ण" कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते.सदर योजनेचे सुधारित निकष व मार्गदर्शक तत्वे शासन निर्णयान्वय विहित करण्यात आले आहेत.सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना निधी व विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील   नगरपंचायतीसाठी सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदांना इस्लामपूर ३ कोटी, आष्टा १ कोटी, शिराळा १ कोटी असे विविध विकास कामांसाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.सदर प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याची माहीती यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात