जिल्हास्तरीय युवा गट कार्यशाळेचे १ डिसेंबर रोजी आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क


पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. 

  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसोर, येरवडा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित  कार्यशाळेत जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात