एसटी संप काळात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / दयानंद गौडगांव
मुंबई दि.७ ; एसटी कर्मचाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यानी मोठे आदेश दिले आहेत. एसटी संप काळात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळाव्यात, तसेच महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महिने संप केला होता. सरकारने अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजु न झाल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा