कै. सदानंदजी नामदेवराव मामासाहेब मोहोळ यांची प्रथम जयंती त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पिनर बॉलर ची कारकिर्द आणि शैक्षणिक कार्य यांच्या आठवनीने साजरी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / उत्तम खेसे
खेड, दि. ६ , पांदेवाडी येथील माध्यमिक विद्यालयात सदानंदराव मोहोळ यांची प्रथम जयंती साजरी करण्यात आली. अडीच महिन्यापूर्वीच सदानंदजीराव मोहोळ यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. प्रथमच जयंती आल्यामुळे सर्व शिक्षकांच्या सेवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. सदानंदराव हे मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष होते. मुख्याध्यापक संभाजी लोखंडे सर यांनी आपल्या भाषणात आप्पासाहेबांनी केलेल्या सहकार्याची आठवण करून दिली. मामासाहेब मोहोळ संस्था मोठी केली. या संस्थेत ४०० ते ४५० कर्मचारी कार्य करतात ही सर्व आप्पा साहेबांची पुण्याई आहे. तसेच ते एक उत्कृष्ट फिरकी बॉलर होते असे मत व्यक्त केले. अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष व जनलोक वार्ता सहसंपादक उत्तमराव खेसे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. “आप्पासाहेब यांनी क्रिकेट मैदाने आपल्या गोलदांजीने गाजवली. क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्विंग बॉलर म्हणून भारतासाठी स्वर्गीय सदानंदराव मोहोळ यांचे मोठे योगदान होते. मामासो मोहोळ शिक्षण संस्था मोठी करण्यासाठी कार्याध्यक्ष, अध्यक्ष म्हणून सदानंदराव मोहोळ उर्फ आप्पासाहेब मोहोळ यांचे महान कर्तुत्व आणि दातृत्व लाभले. त्यांच्या शैक्षणिक संस्थेत आद्यावत ९ ते १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात." या वेळेस रोहीदास शिंदे, गाजरे सर यांचीही भाषणे झाली. मच्छिंद्र हिंगे, शरद सोलोट, चिखले सर, दाते मॅडम, अरूण कोठावते सेवक, कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा