'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी /लतिफ शेख

पुणे, दि. १३: मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. 



राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 


या परिषदेत ‘एलजीबीटीआयक्यू’चा अर्थ आणि फरक, व्यसायामध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथीयांशी संवाद, तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार, आपल्या पाल्याचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद, तृतीयपंथीयांचे चित्रण आणि स्थान : भाषा-साहित्य-पत्रकारिता-चित्रपट, तृतीयपंथीयांचा निवारा आणि आरोग्य, तृतीयपंथीयांसाठी आम्ही काय करणार? या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जमीर कांबळे व पथक हे तृतीयपंथी कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या कविता सादर करणार आहेत. 


परिषदेत तृतीयपंथीयांची वेगळी ओळख, त्यांच्या पालकांनी त्यांचा केलेला स्वीकार-अस्वीकार, त्यांचे आरोग्य, रोजगार, शिक्षण, निवारा या समस्यांचा मागोवा, या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक तरतुदी करण्याची गरज आदी विषयांची चर्चा केली जाणार आहे. तृतीयपंथीयांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात