अक्कलकोट येथे गणरायाला भावपूर्ण निरोप ; लेसर सह डॉल्बी, पारंपारिक वाद्याचा समावेश; मिरवणुकीत महिलांचा सहभाग ; पर्यावरणपूरक विसर्जनास प्रतिसाद

प्रतिनिधी / गजानन अर्वतकर 


   

अक्कलकोट : अक्कलकोट शहरांमध्ये विविध गणेश मंडळाच्या गणरायाला वाजत गाजत निरोप. डॉल्बीचा दणदणाट, झांज पथक व बेंजोचा निनाद, मनोहरी लेसर शो आणि ढोल ताशांच्या कडकडाटावर ठेका धरत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह भव्यदिव्य गणेशमूर्ती आणि आकर्षक आरास शांततापूर्ण मिरवणूक चालली. 


विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसर्जन मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अनेक गणेश मंडळाच्या सकाळच्या सत्रात महिला व युवतींचा मोठा सहभाग होता. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक जमत होते. रात्रीच्या सुमारास तर मुख्य रस्त्यावर अलोट गर्दी पाहावयास मिळाली मिरवणूक मार्गावर विविध संस्था व पक्षाकडून स्वागत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात