राष्ट्रीय बहूजन विकास महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महिला संघटक पदी उषाताई आल्हाट यांची एकमताने निवड

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / दत्ता भगत



पुणे : दि. 13, बालेवाडी येथे  राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाच्या नियुक्ती आणि संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. दिनांक ४/९/२०२२ रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.  त्यामध्ये सौ. उषाताई प्रकाश आल्हाट यांची राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाच्या महाराष्ट्र राज्य माहिला संघटक  पदी निवड करण्यात आली.

                 यावेळी उपस्थितांमध्ये  राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे संस्थापक / अध्यक्ष - बाळासाहेब भांडे, राज्य उपाध्यक्ष - अनिल शिंदे, राज्य कार्याध्यक्ष - विनय आल्हाट,  प्राध्यापक - अवचरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उषाताई प्रकाश आल्हाट यांचे अभिनंदन केले. 

उषा आल्हाट यांची महिला संघटना आहे. सतत महिलांसाठी ते काम करत असतात, त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या अनेक समस्या, अनेक प्रश्न, अनेक अडचणी असतात. आणि त्यांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे . व इथून पुढे  महिलांच्या समस्या साठी काम करीत राहील. संस्थेच्या माध्यमातून सतत काम करेल, याही पुढे समाजातील सर्व घटकांसाठी काम करेल असं त्या म्हणाल्या, त्यांच्या निवडीबाबत सर्व स्थरावरून कौतुक आणि भावी कार्यास शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात