पुणे जिल्ह्यातील खेड येथील राजगुरूनगर शहरामध्ये अवतरले साक्षात गणराय
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / दत्ता भगत
देशभरात अनंत चतुर्दशीच्या निमित्त भक्तीभावाने गणराजाला निरोप देण्यात आला.तोच उत्साह राजगुरुनगर आणि परीसरात दिसुन आला .
राजगुरुनगर पोलीस स्टेशन मधील गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत प्रमुख आकर्षन ठरले ते गणपती बाप्पाची वेशभुषा साखारणारे शिरोली ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगीताई यांचे चिरंजीव अरमान युसुफ शेख या लहाणग्याने गणपती बाप्पाची वेशभुषा केली होती.
एका मुस्लीम मुलाने केलेली हि वेशभुषा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
मागील अनेक वर्षे गणपती बाप्पा हा काल्पनिक कि वास्तव ह्या विषयावर अनेक पुरोगामी विचार सरणीच्या लोकांनी आपली मते मांडली . पण या निरागस लहाणग्याने साकारलेली गणेशाची वेशभुषा तालुक्यातील गणेश भक्तांना नक्किच आवडली आणि भक्तांनी मनोभावे या गणेशाचे दर्शन घेतले . सर्व राजगुरूनगर शहर भक्तमय वातावरणात रममाण झाले. तसेच खेड येथील मोती चौकातील पहिला मनाचा गणपती ची स्थापना टिळकांनच्या हातून झाली आणि त्या गणपतीची आरती करण्याचा मान या उसत्व मंडळाने लहानग्या ला दिला आणि त्यांचा मानसन्मान केला. ह्या ताच्या स्तुत्य उपक्रम राबविले म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा