जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण १८ सप्टेंबर ला राजगुरूनगर येथे होणार
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / लतिफ शेख
खेड : दि.१४, खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ यांच्या वतीने जिल्हा पातळीवर गुणवंत मुख्याध्यापक उपमुख्याद्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत लेखनिक, व गुणवंत सेवक,पुरस्कार सोहळा18 सप्टेंबर रोजी खेड येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यानिमित्ताने माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पदवीधर आमदार अरुण लाड, क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे शिक्षक आमदार आजगावकर, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, व शरद बुटे पाटील, पिंपरी चिंचवड शिक्षणाधिकारी संजय नाइकडे, ठाणे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पंचायत समिती सभापती, व सदस्य जिल्हा
मुख्याध्यापक संघ अध्यक्ष व सचिव व सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात प्रथमच अनेक संघटना मिळून एकच संघटना मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर अनेक कर्मचारी एकत्र येऊन खेड माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघ ही नव्याने संघटना स्थापना करण्यात आली .या संघटनेच्या माध्यमातून प्रथम 2019 मध्ये खेड तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेतील व इंग्रजी विद्यालयातील प्रत्येकी एक एक पुरस्कारवितरण करण्यात आले2019 20 मध्ये कोरोना महामारीमुळे पुरस्कार सोहळा घेण्यात आला नव्हता. म्हणून या संघटनेचे हे दुसरे वर्ष आहे.
यावर्षी संघटनेने जिल्हास्तरीय पुरस्कार घेण्याचे निश्चित केले आहे खेड तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातील एक गुणवंत शिक्षक मुख्याध्यापक किंवा सेवक यापैकी एकाची निवड आपापल्या विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगणमताने एक नाव या संघाकडे पाठवून त्यांची निवड पुरस्कारासाठी घेण्यात आली तसेच पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक मुख्याध्यापक व दोन शिक्षक अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले गुणवंत पुरस्कार बरोबर यावर्षी राजगुरू रत्न पुरस्कार ही देण्यात येणार आहे. ही माहिती संघाचे अध्यक्ष मधुकर नाईक ,कार्याध्यक्ष उत्तम पोटवडे व सचिव रामदास रेटवडे यांनी दिली.
रविवार दिनांक 18 रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्काराचे सर्व नियोजन आसन क्रमांक व सेल्फी पॉईंट तसेच पुरस्कार्थ्याना सुरुची भोजनाची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती नियोजन कमिटीने दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा