खेड तालुक्यातील सहा गावांत लम्पी आजाराचा शिरकाव
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / दत्ता भगत
खेड, दि. १३, खेड तालुक्यातील सहा गावांमध्ये लम्पी आजाराचा शिरकाव मोठया प्रमाणात झाला आहे. तालुक्यातील करंजविहरे,पाईट,रोहकल,किवळे,वाळद आणि चऱ्होली येथे मोठ्या प्रमाणात आढळून आले.
जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या दवाखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तालुक्यात मागणी होत आहे. लसीचे लागण झाल्या पासून पाच किलोमीटर अंतरावर झोन तयार करण्यात आले आहे.या परिसरात ३० ते ३५ हजारच्या जवळपास जनावरे आहेत. या जनावरांना लसीकरणाची मोहीम पशुसंवर्धन खात्याने हाती घेतली आहे.आत्ता पर्यंत पशुसंवर्धन विभागाला सहा हजार डोस उपलब्ध झाले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी स्व: खर्चाने जनावरांना लसी करण करून घेतली आहेत.पशुसंवर्धन विभागाने सर्व पुणे जिल्ह्यामध्ये लसीकरण राबविण्यात येत आहे.
शेतकरी वर्गाने घाबरून जाऊ नये असे आव्हान डॉक्टरांनी दिले आहे.मा. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,सातकरस्थळ मा. सरपंच अजय चव्हाण आणि वाकी बु मा सरपंच पप्पू टोपे यांनी अनेक गावांत लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा