पोस्ट्स

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३ : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल. दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३०  ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज अ

पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.  बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघल  आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती करतांना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी क्रीडा विद्यापीठासाठी  जागा निवडीबाबत चर्चा करण्यात आली. क्रीडा विद्यापीठाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे श्री.पवार यांनी सां

माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.१३ : माजी सैनिकांना १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून कोल्हापूर येथील १०९  इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.  नोकरीसाठी ५ वर्षाच्या आतील सेवानिवृत्त असलेले व  वय ५० वर्षापेक्षा कमी असलेले माजी सैनिक पात्र राहतील.  सेवानिवृत्ती वेतन आदेश (पीपीओ), सेवा पुस्तिका (डिस्चार्ज बुक), सध्याचे ८ रंगीत पासपोर्ट साईज फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला व  आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तयार ठेवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ वर संपर्क साधावा. पुणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.                                      

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची बालगृहाला भेट

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि.१३: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येरवडा येथील बालभवनला भेट  देऊन परिसराची पाहणी केली.  यावेळी आमदार सुनील टिंगरे, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहआयुक्त राहुल मोरे, विभागीय उपआयुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे आदी उपस्थित होते. श्रीमती तटकरे म्हणाल्या, बालभवनात २२ विद्यार्थी महिला व बालविकास विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शासनाच्या बालसंगोपन सुविधेचा लाभ घेत आहेत. परिसरात महिला व बाल विकास विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या इमारतींचे  ऐतिहासिक महत्व जपत  नियमांचे पालन करुन याठिकाणी नवीन इमारती उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. परिसरात महिला बचत गटासाठी सुविधा, नोकरदार महिलासांठी वसतीगृहे आदी सुविधा देण्याच्या विचार करण्यात येत आहे. त्यासाठी उपलब्ध जागेचे योग्य नियोजन करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयासाठी पुर्वीच्या प्रस्तावामध्ये बदल करुन त्यामध्ये आणखीन नवीन बाबी समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये विभागाची सर्व कार्यालये एकाच

डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. १२  : डेक्कन वाहतुक विभागांतर्गत  गांधी क्लासीक कॉर्नरवरील व मॅजिस्टीक विल्स पासून पुढे पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार गांधी क्लासीक अपा. (उजवी बाजू) कॉर्नरवर जोशी हॉस्पिटल बोर्डापासून पुढे लाईटचा पोल नंबर ८८/३४ पर्यंत तसेच मॅजिस्टीक विल्स पासून पुढे लाईट डीपी शेजारी असलेल्या शेफालीका सोसायटी पर्यंत १५ मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे, असे पुणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२  : वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या  धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सूरू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची  माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.  महानगरपालिका, विभागीय शहरे व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थी  इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेताना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा   आणि विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित असलेला भटक्या जमाती 'क' प्रवर्गामधील धनगर समाजातील असावा. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना  आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येते. इत

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाची आढावा बैठक ; अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाई करा–मंत्री धर्मरावबाबा आत्राम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२ : नागरिकांचे आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ  अन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.  व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासनच्या पुणे विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे, सह आयुक्त (औषधे) एस. व्ही. प्रतापराव,  तसेच पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते.  मंत्री श्री. आत्राम म्हणाले,  सणासुदीच्या दिवसात  नागरिकांचा कल विविध मिठाई पदार्थ खरेदी करण्याकडे असतो. अशावेळी नागरिकांना भेसळ मुक्त, स्वच्छ पदार्थ कसे मिळतील हे पाहवे. हॉटेलचे किचन स्वच्छ  असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. कार्यालयात येणाऱ्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. सध्या ऑनलाईन खरेदीवरही नागरिकांचा कल वाढत आहे, त्यावर देखरेख ठेवावी. कॉस्मेटिक, अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक उत्पादकांची तपासणी वारंवार होणे आवश्यक आहे, अशा स

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई,दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे. या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  *समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे:* समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार

भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ४: भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या कालावधीत राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भोलावडे (ता. भोर) येथे आयोजन करण्यात आले आहे. भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी ३ जुलै २०२३ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येऊन ४ ते १८ जुलै २०२३ या कालावधीत रिक्त पदांसाठी अर्ज मागविणेत आले होते. प्राप्त अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु, या उपविभागातील पावसाची स्थिती लक्षात घेता सदर लेखी परीक्षेस जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली होती. आता याबाबत पुन:श्च कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत टपालाद्वारे ओळखपत्र/ प्रवेशपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशपत्र टपालाने प्राप्त न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयातून

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :- पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती- चंद्रकांत दादा पाटील भंडारा- डॉ.विजयकुमार गावित बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील कोल्हापूर- हसन मुश्रीफ गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम बीड- धनंजय मुंडे परभणी- संजय बनसोडे नंदुरबार- अनिल पाटील वर्धा - सुधीर मुनगंटीवार

पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. ४ :- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांना दिले.             वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.             मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील शेतकरी बांधव त्रस्त आहे. त्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांनी देखील याकाळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला मदत करण्याची भूमिका संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने घ्यावी, असे मुख्यमंत्र

कर्वे समाजकार्य महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन ;सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 4: ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारांद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क रहावे. फसव्या मोबाईल कॉल, लिंकला प्रतिसाद देणे टाळावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग तसेच कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आर्थिक सायबर गुन्हे मार्गदर्शन व परिसंवाद' कार्यक्रमात करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कर्वे समाजकार्य महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमास कार्यक्रमास सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त मधूकर पाठक, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त संदिप खर्डेकर, चेअरमन विनायक कराळे, ग्लोबन्ट प्रा. लि.चे एशिया हेड शिवराज साबळे, डिजिटल टास्क फोर्सचे रोहन न्यायाधिश, सीएसआर सेंटर फॉर मेंटल हेल्थचे मानद संचालक डॉ. महेश ठाकूर, ऑस्कॉप संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ, नीलकंठ बजाज, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. डॉ. महेश ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांची सायबर गुन्हेगारीद्वारे आर्थिक फसवणुक होण्

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ओबीसी समाजाची बैठक ; इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके- विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष

रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर 'एक तारीख -एक तास' स्वच्छता उपक्रम; या उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. २९ : - स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात 'एक तारीख- एक तास' या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात  सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल. याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता  आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  बारामती, दि. २३  : सर्वसामान्य नागरिकांना  आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर,अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे,  तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता, डॉ.अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक  डॉ.आमोल शिंदे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे,  डॉ. संतोष भोसले आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण व इतर गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये ५  लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर वैद्यकीय योजनाही राबविल्या जा

बार्टी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.२२: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी  यांच्यात महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.  सामंजस्य करारावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. जयराज किदव यांनी बार्टीच्या पुणे येथील कार्यालयात स्वाक्षरी केली. यावेळी एनआयईएलआयटीचे सहसंचालक डॉ. लक्ष्मण कोर्रा, उपजिल्हाधिकारी आणि बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख अनिल कारंडे, कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई उपस्थित होते.   हा उपक्रम म्हणजे बार्टीच्या कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या कौशल्य उन्नतीसाठी तसेच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे कौशल्य आणि संसाधने एकत्र करून, दोन्ही संस्था कौशल्यातील अंतर भर

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता ; दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.             जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयातील जलसंचय बाष्पीभवनामुळे कमी झाल्याने, बुडित क्षेत्रातील जमिनी मोकळ्या/उघड्या होणार आहेत. या जमिनीमधील ओलावा आणि अत्यावश्यक परिस्थितीत जलाशयाद्वारे उपलब्ध होणारी सिंचन व्यवस्था विचारात घेऊन अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करून चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यास्तव जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील मोठे प्रकल्प, / मध्यम प्रकल्प / लघु प्रकल्पांच्या जलाशयातील गाळपेरा जमीन फक्त चारा

शानदार नृत्यविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात; गायन, ओडिसी नृत्य आणि लोकवाद्यांच्या सूरांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.२२:  कथ्थक कलाकार  नंदकिशोर कपोते, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर सुरेश शर्मा, ओडिसी नृत्यांगना पार्वती दत्ता, सुगंधा दाते, सीमा कालबेलिया लोककलाकार गाजी खान यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृह येथे आयोजित  प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.   उदघाटनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  या नृत्यविष्काराला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाटाने दाद दिली. नृत्य पथकाने मंगलाचरणातील शिव स्तुतीच्या सादरीकरणाच्या माध्यमातून भगवान शंकराला वंदन केले.  पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दशावतार, रामायण, पल्लवी आणि मोक्षाचे अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळाले.  सारेगामा लिटिल चॅम्पस  २०१९ च्या विजेत्या सुगंधा दाते यांनी मराठी अभंग आणि हिंदी चित्रपट गीते सादर केली.  *प्रेक्षक लोकझंकार च्या तालावर नाचले

शासकीय संगणक टायपिंग परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनासाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विभागाच्यावतीने जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या  शासकीय संगणक टायपिंग मराठी, हिंदी व  इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयाच्या परीक्षेचा निकाल २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात परीक्षार्थीने गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी तसेच पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.  परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम कागदावर करून विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधीत विद्यार्थ्यांस सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी, जेणे करून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार  छपाई करुन घेता ये

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. २१: प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) २६  सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.   दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास २६  सप्टेंबर रोजी सकाळी १०.३०  ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट ; विघ्नहर्त्याचा आशिर्वाद पुण्याला, महाराष्ट्राला लाभू दे- देवेंद्र फडणवीस यांचे साकडे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.21: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे आणि ते विघ्न दूर करण्याचे काम करतात. विघ्नहर्त्याचा आशिर्वाद निश्चितपणे पुण्याला, महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. फडणवीस यांनी केले. गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भारुसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशी बाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक  वाडा गणेशोत्सव मंडळ, सहकारनगर येथील सहजीवन मित्र मंडळ, अंबिल ओढा येथील साने गुरूजी मित्र मंडळ, कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे

अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १४ : अभियांत्रिकी क्षेत्रात नावलौकीक असलेल्या आणि  १७० वर्षाची परंपरा असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  माजी विद्यार्थी नियामक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित अभिमान पुरस्कार वितरण समारंभात श्री. पाटील बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु  डॉ. सुधीर आगाशे, माजी विद्यार्थी नियामक मंडळाचे अध्यक्ष भरत गीते,  बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सचिव डॉ. सुजित परदेशी, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते.  पुरस्कार्थींचे अभिनंदन करून श्री. पाटील  म्हणाले, अभिमान पुरस्कार विजेत्यांचा संस्थेलाही अभिमान  आहे.   विद्यापीठाने केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना न देता त्यांनी संस्कारमूल्य जपण्याचेही मार्गदर्शन करावे. देशात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी होत असून मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि.१४:  गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम - १४२ अन्वये किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३, सीएल-३, एफएलबीआर-२, फॉर्म-ई, फॉर्म-ई-२ व ट. ड.-१ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ सप्टेंबर व २८ सप्टेंबर दोन्ही पूर्ण दिवस पूर्ण पुणे जिल्हा, २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती तसेच गणेशोत्सवाचा पाचवा व सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या व सातव्या

माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३  : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.  इयत्ता १२ वी, पदविका व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी इंजिनिअरिंग, बी.टेक, एमबीबीएस, बीडीएस, बी.एड, बीबीए, बी. फार्म, बीसीए, एमबीए, व एमसीए आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची यादी व अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० नोव्हेंबर २०२३  पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.  अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या परिशिष्ट १ ते ३ च्या प्रती सैनिक कल्याण अधिकारी, विद्यापीठाचे कुलगु

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              नवी दिल्ली  13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट  2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.             महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा  गौरव करण्यासाठी  प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  (पीएमआरबीपी) प्रदान करत असते.             या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले  तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीव्दारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. 26 डिसेंबर 2023 रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. मा. राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होण

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व- राज्यपाल रमेश बैस

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 13 : डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा निर्माण केला आहे. त्यांचा जीवनप्रवास  राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि सदैव प्रेरणादायी राहील, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.             विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या 'एैसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल श्री. बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले आदी उपस्थित होते.             राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच आघाडीवर  राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास आहे. या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्द

स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १३: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थाकडून धान्य व फलोत्पादन पिकांच्या मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.  समुदाय आधारीत संस्थेत शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचा महासंघ (फेडरेशन), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ व महिला अर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. समुदाय आधारीत संस्थेने अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना आदी माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळारील सीबीओ टॅब मधील सीबीओ कॉर्नर या शीर्षकात उपलब्ध आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरुन व आवश्यक कागदपत्र सोबत जोडून तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, कृषी भवन, दुसरा मजला, शिवाजीनगर, पुणे यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन स्मार्ट प्रकल्प

खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. 12 : खासगी कंत्राटी परवाना वाहनाने संबंधित संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्केपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे. rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध बसेस संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवान्यावरील वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत. तथापि, काही खासगी प्रवासी बसेस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिमी भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिक

आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ४६ वाहनांचे हस्तांतरण

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे,दि. १२: जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी खरेदी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४६ वाहनांचे हस्तांतरण विधानभवन येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय उपायुक्त वर्षा ऊंटवाल-लड्डा, रामचंद्र शिंदे, उपसंचालक कैलास कराळे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षकीय कामकाज सुरळीत पार पाडता यावे यासाठी वाहन खरेदीकरिता ३ कोटी ६८ लाख रुपये इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिली होती. राज्यातील ५ उपसंचालक, ११ सहायक संचालक, १४ जिल्हा आरोग्य अधिकारी व १६ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरीत करण्यात आली आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार ; विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने ठरेल उपयुक्त- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. १२ : विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्याच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.             राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली (English Communication, Values and Life Skills) या अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार झाला.              मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर आणि  इन्फोसिस उन्नती फाऊंडेशन, बंगळूरचे रमेश स्वामी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, इन्फोसिसचे मुख्य अधिकारी संतोष अंतपुरा उपस्थित होते.             मंत्री.

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे,दि. १२: कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धापरीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे. कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सुचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.

शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह संस्थेचा प्रवेशित सूर्यकांत पाटील यांची समाजसेवा अधीक्षकपदी नियुक्ती

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १२: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह, येरवडा या संस्थेचा प्रवेशित सूर्यकांत पाटील यांची समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) पदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सहआयुक्त राहूल मोरे, उपआयुक्त वर्षा पवार, सहाय्यक आयुक्त अश्विनी कांबळे, येरवडा शासकीय अनुरक्षणगृह अधीक्षक विद्यासागर कांबळे उपस्थित होते. श्री. पाटील हे अनाथ असून त्यांनी नांदेड जिल्ह्यात हांगरगा  येथील बालगृहातून २०१३ मध्ये पुणे येथील शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह येरवडा येथे प्रवेश घेतला. सन २०२२ मध्ये शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करून विभागातर्फे त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे त्यांना अनाथ आरक्षणाचा लाभ मिळाला.   श्री. पाटील यांचे महिला व बालविकास विभागाच्या संस्थेत संगोपन झाले.  त्यांनी येथे शिक्षण घेत बी.ए, एम.एस.डब्लू. ही पदवी उत्तीर्ण केली. सन २०१८ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. सोबत

निराधार मुलांच्या संगोपनासाठी ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार- केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. 12 : काही मुले वेगवेगळ्या कारणांमुळे आपले आई- वडील गमावतात. व निराधार होतात. अशा मुलांना अनाथ म्हणणे अयोग्य आहे. या मुलांचे आपण सर्व जण पालक आहोत. या संस्थेचे कार्य क्षेत्राचा विस्तार होण्याच्या दृष्टीने निराधार मुलांच्या संगोपनासाठी केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘तर्पण’ संस्थेबरोबर सामंजस्य करार करण्यात येईल, असे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.             यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी ‘तर्पण’ संस्थेच्या वतीने प्रतिभा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी बोलत होत्या. यावेळी ‘ऑॅर्फन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ॲकॅडमी सेंटरचे’ केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात उद्घाटन करण्यात आले. निराधार मुलांना मोबाईल, लॅपटॉपचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी तर्पण संस्थेचे अध्यक्ष, आमदार श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय यावेळी उपस्थित होते.    

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड  परीक्षेची पूर्व तयारी करून  घेण्यासाठी छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ३ ते १२ ऑक्टोबर  या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५४ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २५ सप्टेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी.  त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.  उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी  शिफारस  केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, शांतता व सामाजिक सलोखा राखावा- कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  सातारा दि. ११,  पुसेसावळी ता. खटाव येथील कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.       औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंट वरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांना चौकशी कमी बोलवून विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या युवकांकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. दि. १० सप्टेंबर२०२३ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या विचारसरणीच्या सुमारे  शंभर ते दीडशे युवकांनी एकत्र जमून अचानकपणे दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून दिली . पहिल्या समूहातील युवकांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत असताना पोलिसांनी योग्य त्या बाळाचा वापर करून सदर जमावस पांगवण्

बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. ११ :  वन्य प्राण्यांचे स्थलांतर, देखभाल, उपचार नियोजनाची व्यवस्था व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राच्या कामास प्रत्यक्षात सूरूवात झाल्याची माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. देखभाल व उपचार नियोजनासाठी वन्यप्राणी या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या  ३  संस्थांनी मुख्य वन संरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीसमोर सादरीकरण  केले. समितीने दिलेल्या गुणांच्या अनुषंगाने रेस्क्यू (आरइएसक्यू)  धर्मादाय ट्रस्ट, पूणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बावधन येथील  वन्यप्राणी उपचार केंद्राची देखभाल व उपचार नियोजन व्यवस्था करण्याकरिता संस्थेसोबत करार करून केंद्राचे हस्तांतरण करण्यात आले आहे. संस्थेचे प्रतिनिधी, वनविभागाचे कर्मचारी व वास्तू सल्लागार यांनी सामाईक पाहणी करून वन्यप्राणी उपचार केंद्र वन्य प्राण्यांचे स्थलांतर करण्याकरिता  काही  बाबींची पूर्तता  आवश्यक असल्याचे कळविले होते. त्यानुसार आवश्यक बाबींची पुर्तता करून ७ सप्टेंबरपासून  वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु  करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण १३८ वन्यप्राणी व

खंबाटकी घाटात भीषण अपघात ; पाच वाहने एकमेकांवर आदळले

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे दि. ९,  बेंगळुरू मुंबई महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटात ट्रक -टेम्पो आणि चारचाकी वाहनांची एकमेकांना धडक बसून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये सात ते आठ लोक गंभीर जखमी झाले असून सर्व गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास झाला असून यामध्ये एक ट्रक जवळपास १०० फूट खोल दरीत पडली आहे. शिवाय एक टेम्पो रस्त्यावरच पलटी झाली आहे. दरम्यान वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २५ ऑगस्टपासून वरंधा घाट खुला

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   पुणे, दि. 23:  स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उप विभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहे. भारतीय हवामान खाते यांनी अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या लाल आणि नारंगी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने भोर-महाड  मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत  बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. आता भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

निसर्ग सेवा फाउंडेशन तर्फे अक्कलकोट शहरात स्वच्छता मोहीम

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  अक्कलकोट दि .२१, अक्कलकोट येथे निसर्ग सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आला. बस डेपो परिसरा लगत असलेल्या फुटपाथ वरील संपूर्ण काटेरी झाडे झुडपे काढण्यात आली. यामुळे फुटपाथ मोकळी होऊन श्री तिर्थ क्षेत्र नगरीचे झालेले विद्रोपीकरण दूर करण्यात आले . तसेच मादचारी मार्गावर अस्वच्छता, सर्वत्र दुर्गंधी यामुळे नागरिकांना व स्वामी भक्तांना येता जाता त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेऊन सदर परिसर स्वच्छ करण्यात आले. यामुळे फुटपाथ वर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बालकांना चालत जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. या प्रसंगी सर्व स्वयंसेवक मोठ्ठ्या प्रमाणात उपस्थित होते.                           यानंतर ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले. सद्या हिंदूंचा पवित्र समजला जाणारा श्रावण महिना असल्याने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत. भाविकांना स्वच्छ,सुंदर व प्रसन्न वातावरण राहावे त्या दृष्टीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आले होते. निसर्ग सेवा फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमचे  भाविकांनी समाधान व्यक्त करून कौतुक करुन शुभेच्

पुणे शहरात रविवारी 'माझी माती माझा देश' उपक्रमाची सांगता

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या आयोजनाने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.  केंद्र शासन व राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेच्यावतीने 'माझी माती माझा देश' हे अभियान पुणे शहरात मोठ्या उत्साहाने राबवण्यात आले. या अभियानाच्या समारोपाच्या अनुषंगाने  हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर पोलीस वसाहती जवळ शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

चिंचवड येथे 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमाचे २२ ऑगस्ट रोजी आयोजन

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे, दि. १९: 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी'  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अभियानाचे अध्यक्ष आणि राज्यस्तरीय समितीचे मुख्य मार्गदर्शक   ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंगळवार २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी विविध विभागांच्या योजनांचे माहिती देणारे स्टॉल येथे लावण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगाची नाव नोंदणी, मार्गदर्शन, योजनांच्या लाभाची प्रक्रिया पद्धती आदीबाबत संवादही साधण्यात येणार आहे. पुणे  व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्हातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

सहा महिन्यात ईरशाळवाडीचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. १५ : इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यात होईल असा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी  डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला...  दिवसभरातील स्वातंत्र्य दिनानिमित्तचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे  सायंकाळी चारच्या सुमारास इर्शाळवाडीवासियांच्या तात्पुरत्या निवासाची सोय केलेल्या ठिकाणी आगमन झाले. मुख्यमंत्र्यांनी निवास व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही धरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करताना त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.  गेल्या महिन्यात २० जुलैला इर्शाळवाडी दुर्घटना झाली होती. त्यातून बचावलेल्या नागरिकांच्या निवासाची सोय मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण ; आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य  आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.             भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.             ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आं

बाप रे....! सिध्देश्वर एक्स्प्रेस मध्ये महिलेच्या पर्समधून तब्बल इतक्या किंमतीचे दागिने चोरट्यांनी केला लंपास

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   मुंबई दि. १५, सिध्देश्वर एक्स्प्रेस ने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ३३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.९  ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. याबाबत संगीता राजाराम ठाकूर (रा. सोलापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला आपल्या पतीसह दि. ९ आॅगस्ट रोजी कल्याण ते मुंबई बोगी नं. ए ०३ सीट क्र १९, २१ वरुन प्रवास करत हाेते. फिर्यादीस मोहोळ येथे जाग आली असता, फिर्यादीने डोक्याखाली घेतलेली पर्स दिसून आली नाही. त्यांनी लागलीच पतीला उठवून पर्सचा शोध घेत पर्समध्ये ठेवलेल्या मोबाइलवर फोन केला असता मोबाइलचा आवाज आला. त्यानुसार शोध घेतला असता बर्थखाली पर्स सापडली. पर्समधील मोबाइल मिळाला. मात्र त्यामध्ये ठेवलेले १ लाख ६४ हजार ४९९ रुपयांचे २५.६६० ग्रॅम मंगळसूत्र, ३१ हजार ४८५ रुपयांची ५.३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ३७ हजार ६५४ रुपयांची ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण २ लाख ३३ हजार ५३८ रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता.