पोस्ट्स

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर- सहकार मंत्री अतुल सावे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.             ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.              या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.             सन २०१७ - १८, २०१८ - १९ व २०१९ - २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.             यामध्ये प्राथमिक दृष्ट्या पात्र शेतकऱ्यां

महाराष्ट्र स्टार्टअप अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १३: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शुक्रवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणाऱ्या नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले केले आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांचे सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.  सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचराव्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा आदी), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या

जल जीवन मिशन अंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १३:  ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ  उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामाच्या प्रगतीबाबत आठवडानिहाय बैठकीचे आयोजन करावे. प्रलंबित शासकीय जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्रा

राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये सप्टेंबर २०२२  मध्ये १३ हजार ०२४ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महास्वयं वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.             मंत्री श्री. लोढा म्हणाले, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले क

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या“पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.              विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी  विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / राजू शिंगाडे   मुंबई, दि. ११ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,सामान्य प्रशासन विभागाचे  सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.  मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यात ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यात ही वसतीगृह तयार आहेत किंवा जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी त

राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क             मुंबई, दि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळी पूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.             राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतू काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकीत मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /राजू शिंगाडे पुणे, दि. 11: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया कॉलेज सह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत नौरोसजी वाडिया कॉलेज, टाटा असेंब्ली हॉल, वाडीया कॉलेज कॅम्पस येथे  'पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, टॅलेंट कॉर्प सोल्युशन व भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस असोसिएशन, पुणे यांनी या मेळावा आयोजनामध्ये सहभाग घेतला आहे. मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या 6 हजार 643 पदांसाठी सहभाग नोंदविला आहे. ही सर्व रिक्तपदे किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीसीए आदी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात

वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा-राज्यपाल

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे, दि.११: पंढरपुरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडीतपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ.श्रीराम सावरीकर, देवदत्त जोशी, प्रा.प्रगती ठाकूर, रोहन मुटके आदी उपस्थित होते. श्री. कोश्यारी म्हणाले,  वारकरी बांधवाची सेवा हे मोठे कार्य आहे.  समर्पित भावनेने चांगले काम करताना अडचणीही येतात, मात्र अडचणीतून मार्ग काढून कार्य केले तर यश निश्चित मिळते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून २०१५ मध्ये १५ विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुरू झालेल्या 'जिज्ञासा' या वारकरी सेवेच्या उपक्रमात आज ६५० विद्यार्थी  सहभागी झाले आहेत. सात वर्षातील या उप्रकमातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग नोंद घेण्याजोगा आहे, असेही ते म

राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० % अनुदानासाठी धरणे आंदोलन

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे मुंबई विद्यापीठात- राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनुदानाच्या मागणीसाठी गेली २० ते २२ वर्षे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी आता १०० टक्के अनुदान मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार केला आहे. विनाअनुदानित शाळांमधील ८० ते ९० हजार शिक्षक अनुदानाच्या मागणीसाठी मागील कित्येक वर्षे आंदोलन करीत आहेत. मात्र या शिक्षकांना सेवा संरक्षण आणि अनुदान देण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही. आता या शिक्षकांनी 'करो या मरो'ची लढाई सुरू केली असून अनुदान घेतल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंशत: अनुदानित २० आणि ४० टक्के अनुदान घेणाऱ्या, त्रुटी पूर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 'सरसकट' हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षक

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरीची सांगली जिल्हा कार्यकारी समिती जाहीर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क सांगली (प्रतिनिधी): राज्यभर नावलौकिक मिळवत असलेली भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संस्थेची सांगली जिल्हा कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे..         संस्थेचे अध्यक्ष विशाल शिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, महिलाध्यक्षा चैताली कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.सुमंत प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुढील जिल्हा कार्यकारणी: अध्यक्ष शुभम अशोक मोहीते, उपाध्यक्ष प्रसाद सुर्यवंशी, महिलाध्यक्षा अरूणा मोहिते पाटील, सचिव अमृता खोत, सहसचिव विश्वजीत पाटील, खजिनदार विशाल ससे, कोषाध्यक्ष अक्षय पाटील, तंत्रस्नेही पदी रिना पाटील तसेच दैनिक जनलोकवार्ता सांगली जिल्हा सहसंपादक विशाल खुर्द यांची संस्थेच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे..

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. १०: जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वारगेट येथे जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने 'भेटूया दिग्गजांना' या पुस्तकाच्या प्रकाशन तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. के. एच.संचेती, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जनसेवाचे अध्यक्ष विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, मीना शहा, जे.पी.देसाई  उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शैक्षणिक तसेच उद्योग क्षेत्रात पुण्याचे देशात नाव आहे. प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी पोषक वातावरण असलेल्या महानगरात जेष्ठ नागरिकांसाठी जनसेवा फाऊंडेशन सेवाभावाने काम करत आहे. जेष्ठांची सेवा हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून संस्था यापुढील काळातही ते सुरू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'भेटूया दिग्गजांना' या पुस्तकांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तब्बल १९ दिग्गजांचा जीवन प्रवास मांडण्यात आला आहे. समाजासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी आणि  येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठ

आजपासून चांदणी चौक येथील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे, दि. १०: मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री १२.३० ते १.०० वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.      सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे. वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे. 000

महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य केले- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी पुणे, दि. १०: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इंग्रज राजवटीत महिला शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. त्यांनी महिला शिक्षणाद्वारे देशासह महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कर्वेनगर येथील कर्वे सामाजिक संस्थेच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, इंग्रज राजवटीत महिलांना शिक्षण मिळत नव्हते, त्यांना घरकामापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले. पारंपरिक बंधने तोडून स्त्रियांचे पुर्नविवाह घडवून आणले. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी  विद्यापीठाच्या माध्यमातून महिला शिक्षणाचे हे कार्य आजही सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी नागरिकांमध्ये महिला शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली.  महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी

राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाचे ११ ऑक्टोबरला उद्घाटन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / राजू शिंगाडे पुणे, दि.१०: राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महसुली विभाग नवीन कार्यालयाचे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीष बापट, वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, उमा खापरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली आहे. पुणे विभागाची कामगिरी पुणे विभागात‘आपले सरकार’पोर्टलवर ३७ विभागांच्या ३९२ सेवांबाबत ऑक्टोबर २०१५ पासून सप्टेंबर २०२२ पर्यंत प्राप्त २ कोटी ४३ लाख ९८ हजार अर्जापैकी २ कोटी ३१ लाख २ हजार अर्ज (९५ टक्के) निकाली काढण्यात आले आहेत. यापैकी सर्वाधिक ४२ लाख ६९ हजार अर्ज २०१९-२० मध्ये प्राप्त झाले व त्यापैकी ४० लाख ५२ हजार निकाली काढण्यात आले.  चालू वर्षात सेवा

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव ; पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / गणेश वाघ   पुणे दि.८: वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी आयोजित संत दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते, महेंद्र थोरवे, मारोती महाराज कुरेकर, दासोपंत स्वामी आळंदीकर, महंत पुरुषोत्तम दादा महाराज, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला महान संत परपरा आणि वारकरी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला हे भाग्य लाभले नसेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेत भजन, किर्तनाला मोठे स्थान आहे, ही एक

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त शिधावस्तू संचाचे वितरण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /दयानंद गौडगांव पुणे दि.८:  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधा वस्तूंचा समावेश असलेला १ शिधावस्तू संच ई-पास प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व परिमंडळ अधिकारी यांची एकत्रित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत शिधा संच पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.  जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना शिधा संच प्रति शिधापत्रिका  १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा ग्रामीण व शहरामध्ये एकुण अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या ९ लाख १५ हजार ६३२ असून पात्र शिधापत्रिका धारकांना जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस यंत्राद्वारे  वितरण करण्यात येणार आहे.

कै. सदानंदजी नामदेवराव मामासाहेब मोहोळ यांची प्रथम जयंती त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पिनर बॉलर ची कारकिर्द आणि शैक्षणिक कार्य यांच्या आठवनीने साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे खेड, दि. ६ , पांदेवाडी येथील माध्यमिक विद्यालयात सदानंदराव मोहोळ यांची प्रथम जयंती साजरी करण्यात आली. अडीच महिन्यापूर्वीच सदानंदजीराव मोहोळ यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. प्रथमच जयंती आल्यामुळे सर्व शिक्षकांच्या सेवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. सदानंदराव हे मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष होते. मुख्याध्यापक संभाजी लोखंडे सर यांनी आपल्या भाषणात आप्पासाहेबांनी केलेल्या सहकार्याची आठवण करून दिली. मामासाहेब मोहोळ संस्था मोठी केली. या संस्थेत ४०० ते ४५० कर्मचारी कार्य करतात ही सर्व आप्पा साहेबांची पुण्याई आहे. तसेच ते एक उत्कृष्ट फिरकी बॉलर होते असे मत व्यक्त केले. अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष व जनलोक वार्ता  सहसंपादक उत्तमराव खेसे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. “आप्पासाहेब यांनी क्रिकेट मैदाने आपल्या गोलदांजीने गाजवली. क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्विंग बॉलर म्हणून भारतासाठी स्वर्गीय सदानंदराव मोहोळ य

एसटी संप काळात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव  मुंबई  दि.७ ; एसटी  कर्मचाऱ्यांबाबत   मुख्यमंत्र्यानी मोठे आदेश दिले आहेत. एसटी संप काळात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ए सटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळाव्यात, तसेच महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात  अनेक महिने संप केला होता. सरकारने अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजु न झाल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा १५ टक्क्यांनी वाढ ; यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशीत विद्यार्थ्यांची संख्या ८५ टक्के- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी   / राजू शिंगाडे   मुंबई, दि. ७ शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची  प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मागील तीन वर्षों प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के  होत असलेली वाढ  यावर्षी १५ टक्के   झाली आहे. या  प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या आता जवळपास ८५ टक्के झालेली आहे, अशी माहिती  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या सन २०१८-१९  मध्ये  ४१  टक्के होती, ही संख्या २०१९-२०  मध्ये ५० टक्के तर २०२०-२१ मध्ये ६० टक्के आणि २०२१-२२ मध्ये ७० टक्के होती.  या वर्षीच्या शैक्षणिक वर्षांत ही संख्या ८५ टक्के  एवढी विक्रमी झाली आहे. पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे सांगून पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवावा असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी  केले आह

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी   / लतीफ शेख पुणे दि.७:  कामगारांच्या आरोग्य, शिक्षणासोबतच त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. क्रेडाई संस्थेच्या सर्वोत्तम सुविधा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीष मगर, राज्याचे अध्यक्ष अध्यक्ष सुनील फुरडे, पुण्याचे अध्यक्ष  अनिल फरांदे आदी उपस्थित होते. कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले, आपला प्रत्येक कामगार ही आपली शक्ती आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कामगारांच्या  सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना आहेत.  कामगारांना सुरक्षे संदर्भात देण्यात आलेल्या सुविधांचा कामगारांनी उपयोग करावा. कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालय स्तरावर कामगार भवन उभारण्यात येईल तसेच कामगारांसाठी घरकुल योजना राबविण्यात येईल. संघटित कामगारांसोबतच असंघटीत कामगारांसाठीदेखील सोई सुविधा देण्यात येतील, अ

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला पुणे विभागातील कामाचा आढावा ;कामगार भवन बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे नियोजन करा- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / दयानंद गौडगांव पुणे, दि.७ : कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.  साखर संकुल येथे आयोजित कामगार विभागाच्या पुणे विभागीय आढावा बैठकीत  ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक एम. आर. पाटील, अपर संचालक अ. धो. खोत उपस्थित होते. कामगार भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडणे आवश्यक असून जागा निवडताना कामगारांची सोय पहावी. या इमारतीत जिल्हा कार्यालये व विभागीय कार्यालये अशी स्वतंत्र व्यवस्था असावी. शक्यतो एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भूमीपूजन या वर्षातच होईल असे नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करा असे डॉ. खाडे यावेळी म्हणाले.  कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.  पुणे विभागातील कामगार व

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांची पाने जोडलेली पुस्तके आवश्यक-दीपक केसरकर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / दत्ता भगत पुणे दि.७-सर्वसामान्य शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने टाकण्याबाबत बालभारती येथे विषय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.  श्री.केसरकर म्हणाले, शिक्षकांनी पुस्तकातील विषयावर दिलेली टिपणे विद्यार्थ्याने या पानांवर लिहावे अशी अपेक्षा आहे. त्यावरून शिक्षकांनी वर्गात घेतलेला अभ्यासही लक्षात येईल. गरीबतल्या गरीब मुलालाही वह्यांची पाने असलेली पुस्तके उपयुक्त ठरली पाहिजेत. प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल आणि पालक-शिक्षकांकडून य

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे गरजेचे-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / उत्तम खेसे पुणे दि.७: आधुनिक भारत घडविण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देणे आणि त्यादृष्टीने पूरक शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षण संचालक महेश पालकर, संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ.महेश आठवले, कार्यवाह प्रा.धनंजय कुलकर्णी, डॉ.स्वाती जोगळेकर, ॲड.अशोक पालांडे, मुख्याध्यापक सुनील शिवले आदी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री.केसरकर म्हणाले, योगसाधनेद्वारे स्मरणशक्ती वाढविण्यावर आणि मन एकाग्र करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांसाठी व्यायामाचे महत्व लक्षात घेऊन शारीरिक शिक्षणासाठी सुविधा देण्यासोबत शालेय जीवनात योगाभ्यास आणण्याबाबत विचार करण्यात येत आहे. आधुनिक तंत्र शिक्षणासोबत गायनासारख्या कलेचा अभ्यासही विद्यार्थ्यांना करता यावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांनी यशस्वी माजी व

दावडी विद्यालयात वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / विजय कानवडे खेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या ठिकाणी वन्यजीव सप्ताह निमित्त जुन्नर वन विभाग व  खेड वनपरिक्षेत्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले .कार्यक्रमाच्या निमित्त वन परिमंडल अधिकारी जी. वाय.कुलकर्णी, डी.डी. फापाळे, वनरक्षक शिवाजी राठोड वन कर्मचारी एम .बी .बढे, अशोक वरुडे, रमेश जरे शंकर बोत्रे, विद्यालयाचे  प्राचार्य अंकुश केंगारे ,पर्यवेक्षक  महादेव आगम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमा अंतर्गत वनरक्षक  श्री शिवाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना  नष्ट होत चाललेल्या वन्य प्रजातींचे  संवर्धन करण्याविषयी प्रबोधन केले. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून  बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याच्या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर वन परिमंडळ अधिकारी जी.वाय. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले व  वन्यजीव सप्ताहा निमित्त निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी निर्धार शपथ घेऊन वनसंवर्धन

संजय गांधी निराधार योजनेसाठी ६२५ कोटी, श्रावणबाळसेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी ;सर्व जिल्ह्यांना वितरण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / धर्मपाल कांबळे             मुंबई, दि.६ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत  १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे.  संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.              या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले ज

अल्पसंख्याक विकास महासंघ पुणे शहर अध्यक्षपदी समीर शेख यांची निवड

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क                                                                                    प्रतिनिधी  / इस्माईल तांबोळी         पुणे : अल्पसंख्याक विकास महासंघ पुणे शहर व जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक व विधायक काम करणारी अग्रेसर संस्था असून अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. या सामाजिक व विधायक कार्य करणाऱ्या अल्पसंख्याक विकास  महासंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी समीर शेख यांची गुरुवार दिनांक  दिनांक ५/१०/२०२२ रोजी निवड करण्यात आली. यावेळी समीर शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की.“माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुणे शहर अध्यक्षपदी निवड केली, या महासंघाचे काम मी प्रामाणिक व निष्ठेने करून लोकांच्या अडीअडचणी व प्रश्नासाठी मी सदैव कार्यरत राहील." यावेळी त्यांना संस्थापक / अध्यक्ष रफिक भाई कुरैशी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी आनंद घेडे, अर्फणास सय्यद व संस्थेचे सदस्य व पदाधिकारी  कार्यकर्त उपस्थित होते.

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / सलीम तांबोळी पुणे, दि.६: शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ आदी उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध विद्यापीठे, राष्ट्रीय, राज्यपातळीवरील शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्थासोबत सामजस्य करार करण्यात आले.  सामंजस्य करारांवरील स्वाक्षऱ्यांनंतर संस्थाचे अभिनंदन करुन श्री. पाटील म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावत आहे. शैक्षणिक क्षेत्रा

पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहनाकडून दुचाकी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका लवकरच

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / दयानंद गौडगांव पुणे दि ६ : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केके’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि उपलब्ध असलेला आकर्षक नोंदणी क्रमांक सुलभतेने तो मिळावा यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे.  नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी ११ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११ ते द

पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन; राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / चंद्रकांत सलवदे पुणे दि.६: नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.  पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.  राज्यपाल श्री.देवव्रत म्हणाले, हरितक्रांतीमुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ झाली. मात्र रासायनिक खतांचा उपयोग किती प्रमाणात करायचा हे न कळल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सें

डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती वाडा विद्यालयात उत्साहात साजरी

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी / उत्तम खेसे खेड दि २८; रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अ‍ॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय वाडा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 135 वा जयंती सोहळा रयत शिक्षण संस्थेचे,पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या याप्रसंगी प्रमुख उपस्थिती शंकरशेठ हुंडारे पाटील,नगरसेवक मुंबई, आनंदराव तांबे,आजीव सभासद रयत शिक्षण संस्था सातारा हे होते.          कार्यक्रमा वेळी प्रथम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले यानंतर  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप,दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेले तीन विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यात आले त्यात प्रणय तनपुरे, अभिषेक कडलग व स्नेहल गुंडाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले शंकरशेठ हुंडारे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात  रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग,चेअरमन राम

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान ; भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  मुंबई दि. २८ : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण  ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  आज रविंद्र नाट्यमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन २०२० चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन २०२१ चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सदा सरवणकर, आमदार आशीष शेलार

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत ; केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /राजू शिंगाडे   पुणे, दि. २८: देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकं

तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  / प्राजक्ता पाटील   पुणे दि.२८: देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च संस्था (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान आणि ओळखपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.   शिबिरात तृतीयपंथीयांना आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण उपायुक्त रविंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, पुणे मनपा उपायुक्त रंजना गगे, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर आणि विविध तृतीयपंथी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  तृतीयपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एकत्रित पुढाकारातून तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे श्री.पाटोळे यांनी यावेळी सांगितले.  शिबिरात २० तृतीयपंथी व्यक्ती सहभागी झाल्या होत्

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत' ; माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी  /दत्ता भगत   पुणे दि.२८: राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आयोजित 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचा शुभारंभ आणि महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आदी उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, घरातील महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असते. कुटुंबासाठी झिजताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती साधारण हीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या