अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त शिधावस्तू संचाचे वितरण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी  /दयानंद गौडगांव


पुणे दि.८:  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधा वस्तूंचा समावेश असलेला १ शिधावस्तू संच ई-पास प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व परिमंडळ अधिकारी यांची एकत्रित व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत शिधा संच पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.


 जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना शिधा संच प्रति शिधापत्रिका  १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा ग्रामीण व शहरामध्ये एकुण अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या ९ लाख १५ हजार ६३२ असून पात्र शिधापत्रिका धारकांना जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस यंत्राद्वारे  वितरण करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात