डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती वाडा विद्यालयात उत्साहात साजरी
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / उत्तम खेसे
खेड दि २८; रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय वाडा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 135 वा जयंती सोहळा रयत शिक्षण संस्थेचे,पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या याप्रसंगी प्रमुख उपस्थिती शंकरशेठ हुंडारे पाटील,नगरसेवक मुंबई, आनंदराव तांबे,आजीव सभासद रयत शिक्षण संस्था सातारा हे होते.
कार्यक्रमा वेळी प्रथम प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप,दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेले तीन विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यात आले त्यात प्रणय तनपुरे, अभिषेक कडलग व स्नेहल गुंडाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले शंकरशेठ हुंडारे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग,चेअरमन राम कांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी प्रतिपादन केले तसेच एन.एम.एम.एस., स्कॉलरशिप,दहावी व बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले
याप्रसंगी रघुनाथ शेठ लांडगे, सरपंच,ग्रामपंचायत वाडा,श्रीकांत मारुती शेटे,अध्यक्ष सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाडा ग्रुप मुंबई, नवनाथ मारुती बोराडे,उपाध्यक्ष सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाळा ग्रुप मुंबई, शिवाजी दत्तात्रय मोरे उपाध्यक्ष सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाडा ग्रुप मुंबई,दिनेश ज्ञानदेव मोरे,सेक्रेटरी सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाडा ग्रुप मुंबई ,गुलाब कृष्णा वाडेकर संचालक सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाडा ग्रुप
मुंबई,मच्छिंद्र शांताराम मोरे संचालक सुसंघटित आदर्श सेवा मित्र मंडळ वाडा ग्रुप मुंबई ,रोहिदास शेटे सदस्य स्थानिक स्कूलकमिटी , काळुराम सुपे सदस्य स्थानिक स्कूल कमिटी,कुमुदिनीताई केदारी सदस्य स्थानिक स्कूल कमिटी,पांडुरंग भिकाजी हुंडारे पाटील,थोर देणगीदार संतोष नामदेव हुंडारे व्हाईस चेअरमन विकास सोसायटी वाडा, गोरक्षनाथ हुंडारे ,सुभाष वाडेकर, प्रकाश पाटील, शिवाजी मोरे, नागेश हुंडारे, बबन वांभुरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शिवाजीराव दुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन आशिष कांबळे व मुलांनी आय.आय. यांनी केले आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सतीश हाके यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा