दावडी विद्यालयात वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांचे प्रबोधन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / विजय कानवडे
खेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी या ठिकाणी वन्यजीव सप्ताह निमित्त जुन्नर वन विभाग व खेड वनपरिक्षेत्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले .कार्यक्रमाच्या निमित्त वन परिमंडल अधिकारी जी. वाय.कुलकर्णी, डी.डी. फापाळे, वनरक्षक शिवाजी राठोड वन कर्मचारी एम .बी .बढे, अशोक वरुडे, रमेश जरे शंकर बोत्रे, विद्यालयाचे प्राचार्य अंकुश केंगारे ,पर्यवेक्षक महादेव आगम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
सदर उपक्रमा अंतर्गत वनरक्षक श्री शिवाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना नष्ट होत चाललेल्या वन्य प्रजातींचे संवर्धन करण्याविषयी प्रबोधन केले. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याच्या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर वन परिमंडळ अधिकारी जी.वाय. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले व वन्यजीव सप्ताहा निमित्त निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी निर्धार शपथ घेऊन वनसंवर्धन करण्याचे ठरविले. सदर कार्यक्रमाच्या नंतर विद्यालयांमध्ये लालचंद बरोटा यांनी कागद कलेचा प्रात्यक्षिक सादर केले व देशभक्तीपर गीत गायन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास बरबटे यांनी केले तर कृतज्ञता प्राचार्य अंकुश केंगारे यांनी व्यक्त केले
विजय कानवडे
प्रतिनिधी जनलोक वार्ता खेड
👍
उत्तर द्याहटवा