अल्पसंख्याक विकास महासंघ पुणे शहर अध्यक्षपदी समीर शेख यांची निवड
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / इस्माईल तांबोळी
पुणे : अल्पसंख्याक विकास महासंघ पुणे शहर व जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक व विधायक काम करणारी अग्रेसर संस्था असून अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. या सामाजिक व विधायक कार्य करणाऱ्या अल्पसंख्याक विकास महासंघाच्या पुणे शहराध्यक्षपदी समीर शेख यांची गुरुवार दिनांक दिनांक ५/१०/२०२२ रोजी निवड करण्यात आली. यावेळी समीर शेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की.“माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुणे शहर अध्यक्षपदी निवड केली, या महासंघाचे काम मी प्रामाणिक व निष्ठेने करून लोकांच्या अडीअडचणी व प्रश्नासाठी मी सदैव कार्यरत राहील." यावेळी त्यांना संस्थापक / अध्यक्ष रफिक भाई कुरैशी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी आनंद घेडे, अर्फणास सय्यद व संस्थेचे सदस्य व पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा