पुण्यात जैन मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी केला लाखो रुपये लंपास
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे प्रतिनिधी,दि.२८, पुण्यातील कोंढवा - कात्रज रस्त्यावर असलेल्या जैन मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. मंदीरातील तब्बल चार दानपेट्या फोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही घटना २६ ते २७ एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी राजकुमार बन्सीलाल राजपूत यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.