भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत कार्यशाळा संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे, दि. ३१ : समाज कल्याण विभागाच्यावतीने भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत जिल्ह्यातील महाविद्यालयांची कार्यशाळा पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ३५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेमध्ये स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती या योजनांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करुन प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या. सन २०१८-१९ ते २०२२-२३ पर्यंतचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, शैक्षणिक वर्ष सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचे अर्ज भरून घ्यावेत व शिष्यवृत्ती प्रलंबित असताना महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्र अथवा शिष्यवृत्ती शाखेने विद्यार्थ्यांच्या महा-डीबीटी व स्वाधार योजनेसंदर्भातील शंकाचे निरसन तेथेच करावे. समाज कल्याण विभागाच्या सूचनांचे प